डीपी प्लॅननुसार सेलूतील रस्त्याचे रुंदीकरण करा

माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचा आंदोलनाचा इशारा

सेलू / नारायण पाटील – शहरातील मंजूर मुख्य रस्त्याचे रुंदीकरण डीपी प्लॅननुसार करावे; अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी दिला आहे.

 

यासंदर्भात मुख्याधिकारी यांना श्री लहाने यांनी गुरुवारी, ३० मे रोजी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सेलू शहराच्या सर्वांगिण विकासासाठी व भविष्यातील ५० वर्षातील रहदारीचा व विकासाच्या अनुषंगाने शासनाने शहराच्या चोहोबाजूने डीपी रोड जे की, २४ मीटर रुंदीचे असून त्यास नाली, फुटपाथ, दुभाजक व विद्युत पोल इत्यादी सोयींनीयुक्त बनवण्यासाठी व शहराच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर करुन विकास कामांना तांत्रिक व प्रशासकीय मंजूरी दिलेली आहे.

 

यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वालूर नाका मार्गे परभणी रोड फिल्टरपर्यंत डीपी रस्त्याची मान्यता दिलेली होती. परंतु शासकीय मान्यतेनुसार व मान्य तांत्रीक व प्रशासकीय मंजुरीनुसार सदर काम झालेले नाही, या ठिकाणी पालिका प्रशासनाची व प्रस्थापीत पदाधिकाऱ्यांच्या मनमानीस जुमानून रस्त्यावरील दुतर्फाचे अतिक्रमणे न हटवता फक्त गोरगरीबांचे अतिक्रमण जबरदस्तीने पाडून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. हे सरकारच्या निकषाला व लोकशाहीला धरुन नाही. तसेच नूतन कॉलेज रोड ते गोविंद बाबा चौक प्रस्तावीत डीपी रस्त्यावरील सर्वंकष अतिक्रमणे हटवावीत जेणेकरुन धनदांडग्याला न्याय व गरीबावर अन्याय होणार नाही, याची गांभीर्याने काळजी घ्यावी, अन्यथा सेलू शहरातील जनतेला व पदाधिकाऱ्याला आपणावर योग्य ती कार्यवाही प्रस्तावीत करण्यासाठी सरकारकडे न्याय मागण्यात येईल याची नोंद घ्यावी. सदरील बाबीची पुर्तता न झाल्यास पालिका कार्यालयासमोर सर्व पदाधिकारी व सेलू शहरातील जनतेसह आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Comments (0)
Add Comment