10  वर्षातील विकासाचा अनुशेष भरुन काढणार- जयप्रकाश दांडेगावकर

हिंगोली,दि
वसमत विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्यामुळे निवडणुकीत चांगली रंगत आली असून दांडेगावकर यांच्या बैठक,सभांना मोठा प्रतिसाद लाभत आहे.मतदार संघातील 10  वर्षातील विकासाचा अनुषेश भरुन काढणार असे दांडेगावकर यांनी सांगीतले आहे.टक्केवारी,माफीया, सुडाच्या राजकारणाचा बंदोबस्त करण्याची लढाई आपण जिंकणार असा विश्वास दांडेगावकर यांनी व्यक्त केला आहे.

जयप्रकाश दांडेगावकर यांनी वसमत विधानसभा मतदारसंघाचे 2004 ते 2014 पर्यंत नेतृत्व केले.2004 ते नऊ पर्यंत ते सहकार राज्यमंत्री होते. पूर्णा सहकारी साखर कारखाना,बाराशिव,टोकाई या साखर कारखान्याचे त्यांनी यशस्वीपणे नेतृत्व केले. वसमत तालुक्यात शेतीला सुजलाम सुफलाम करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीत वसमत तालुक्याला त्यांनी नेले आहे, साखर कारखानदारीच्या माध्यमातून ऊस उत्पादकांचे हित जपले. त्यामुळे मतदारांच्या आग्रहा खातर दांडेगावकर यांनी पुन्हा आता यंदा निवडणुकीत उडी घेतली आहे. दांडेगावकर यांनी विद्यमान आमदारासमोर चांगलेच तगडे आव्हान उभे केले आहे. जुनी जाणती मंडळी तरुण मंडळी ही दांडेगावकर यांच्यासोबत असून गावोगावी त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील दांडेगावकर यांच्यासाठी सभा घेतली. दांडेगावकर हे शरद पवारांचे खास विश्वासू आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास दांडेगावकर हे मंत्री होतील असा शब्द देखील श्री.पवार यांनी दिला आहे. दांडेगावकर यांनी राष्ट्रीय साखर संघाचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्यांची देशभरात ओळख आहे.येलदरी धरणाचे पाणी मतदार संघात आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. वसमत तालुक्याला समृद्ध करण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.एक शेती,शिक्षण क्षेत्रातील अभ्यासु जेष्ठ नेतृव म्हणून त्यांची ओळख आहे.
…………
वसमत मतदार संघाला पाच वर्षात धूळधाण करणाऱ्या विद्यमान आमदारांचा पराभव मी नव्हे तर सर्वसामान्य जनता करणार आहे मला मतदारांनी उभे केले आहे त्यामुळे मी उमेदवार नसून तरी सर्वसामान्य जनता उमेदवार आहे संधी मिळाल्यास वसमत मतदार संघाला पुन्हा सुजलाम झोपला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राहणार आहेत, उपलब्ध असलेल्या सिंचनाचा अधिक फायदा व्हावा म्हणून शेतकरी हायटेक करणार, ग्रामीण भागामध्ये गुणवत्तापूर्ण भौतिक सुवीधांनी परिपुर्ण  अशा जिल्हा परिषदेच्या शाळा निर्माण करणार-
जयप्रकाश दांडेगावकर

Comments (0)
Add Comment