सेलू,दि 10 ( नारायण पाटील )
पाथरी येथील साईबाबा मंदिर शेजारी राहणारी महिला रुख्मिनबाई श्रीराम टेहरे ( ७०) या प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी जात असतांना रस्त्यातच बेपत्ता झाल्या मुळे नातेवाईकांची धाकधूक वाढली आहे .
पाथरी येथील महिला प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी जाण्यासाठी दि ८/१/२४ बुधवार रोजी सकाळी मराठवाडा एक्सप्रेस गाडीने मानवत रोड वरून रेल्वे मध्ये बसल्या होत्या .टाकरवन येथील चैतन्यजी महाराज यांच्या ग्रुप बरोबर त्या होत्या .यामध्ये पाथरी येथून ७ते ८ जण यात्रेकरू होते .तेथून पुढे त्या मुबंई ते वाराणशी या कामायनी एक्सप्रेस मध्ये मनमाड येथून सायंकाळी ६ वाजता पुढील प्रवासासाठी बसल्या होत्या .त्यांच्या सोबत बरेचसे यात्रेकरू देखील होते .सर्वांनी रात्री रेल्वेमध्ये सोबत जेवण केले .व झोपी गेले .दरम्यान भोपाळ च्या अलीकडे असलेल्या नर्मदापुरम स्टेशन वर त्या त्यांच्या सीट वर नसल्याची कल्पना सोबतच्या प्रवाशांना आली .त्यांची सोबतची सामानाची पिशवी व त्यांच्या चपला देखील तेथेच आढळून आल्या .परंतु रुख्मिनबाई मात्र सीटवर नव्हत्या .त्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला .व त्यांच्या नातेवाईकांना
देखील सदरील घटना कळविण्यात आली .परंतु अजूनही त्यांचा शोध लागत नसल्यामुळे त्यांचे कुटूंबीय व नातेवाईक चिंताग्रस्त बनले आहेत .
रुख्मिनबाई यांचे वय झाल्यामुळे कुंभमेळ्यासाठी जाण्यासाठी त्यांचा मुलगा आत्माराम टेहरे यांनी विरोध केला होता .परंतु त्यांनी हट्ट धरला व मुलींकडून पैसे घेऊन नोंदणी करून पैसे भरले होते .त्याना फक्त मराठी येते .त्यामुळे त्यांना आपला पत्ता सांगणे देखील अवघड आहे .तरी देखील त्यांचे नातेवाईक कसोशीने तपास करीत आहेत .