सेलू बसस्थानकातील खड्डे बुजण्याचे काम सुरू

सेलू,दि 13 (प्रतिनिधी)ः येथील बसस्थानक मध्ये पडलेल्या मोठ मोठ्या खड्डे बुजवण्याच्या कामाला आज प्रत्यक्ष सुरुवात झाली असून माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या प्रयत्नांना यश आले आहे .
जरी सेलूचे बसस्थानक व दुकानांचे काम बांधा व वापरा या तत्वावर सुरू झाले असले तरी गेल्या कित्येक वर्षांपासून परिसरात मोठमोठे खड्डे पडले होते .पावसाळ्यात तर या खड्ड्यामुळे बसस्थान परिसराला अक्षरशः तळ्याचे स्वरूप प्राप्त होत होते .या खड्यातून बस आत व बाहेर नेताना चालकांना कसरतच करावी लागत होती .प्रवाशांना तर “डग मग डोले माझी पाण्यावरी नाव रे ” याचाच प्रत्यय येत होता .प्रवाशाकडून या बाबत वेळोवेळी मागणी करून देखिल प्रशासन मूग गिळून गप्पच होते .शेवटी माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी स्वतः डेपो मॅनेजर व विभागीय नियंत्रक यांना भेटून प्रवाशांची अडचण सगीतलीबव त्यांनी लवकरात लवकर या कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले होते .व आज या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे .यामुळे नागरिकांत व प्रवाशी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे .

Comments (0)
Add Comment