अन्वी राठोडला राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक

0 186

निफाड,दि 30 (प्रतिनिधी)ः
इन्स्पिरिया लॅप्रोस्कोपी आणि आय.व्ही.एफ.रिसर्च सेंटर राहता, (शिर्डी ) द्वारे आयोजित राज्यस्तरीय भगवदगीता वक्तृत्व स्पर्धा 2021 या स्पर्धेमध्ये लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित जिजामाता प्राथमिक शाळा लासलगाव येथील इयत्ता चौथीची विद्यार्थीनी अन्वी संदीप राठोड हिने सहभाग घेऊन द्वितीय क्रमांकाचे प्रावीण्य मिळविले.राज्यभरातुन सुमारे दोनशे स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते.काल राहता येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.स्पर्धेचे आयोजक डॉ.नितीन घोरपडे व सौ. डॉ.मंजुश्री घोरपडे व इस्कॉन संस्था प्रमुख प्रभुजी यांनी, अन्वीचे पालक डॉ.संदिप राठोड व प्रा.योगिता राठोड यांचे शुभहस्ते तिचा पारितोषिक देवून सन्मान करण्यात आला.पारितोषिक रोख रक्कम रुपये 2500 तसेच भगवदगीता व प्रमाणपत्र देण्यात आले. तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अनिस काझी, उपशिक्षक कैलास भामरे,दिलीप शिरसाठ, सुहास बच्छाव, समीर देवढे, राजेंद्र जाधव, योगीराज महाले, केदुबाई गवळी, बद्रीप्रसाद वाबळे, बाळकृष्ण वाजे यांचे वतीने सत्कार करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर,शंतनू पाटील,प.स. सदस्य रंजनाताई पाटील,संचालिका निताताई पाटील ,पुष्पाताई दरेकर,सिताराम जगताप, तुळशीराम जाधव,संस्थेच्या कार्यकारी अधिकारी वैष्णवी ताई पाटील व इतर संचालक मंडळ, लासलगाव सरपंच जयदत्त होळकर, वेदिका होळकर, लोकनेते विद्यालय प्राचार्य पाटील, पर्यवेक्षक दत्तू गांगुर्डे, जिजामाता कन्या विद्यालय मुख्याध्यापिका संजीवनी पाटील, पर्यवेक्षक सुधाकर सोनावणे यांनी अन्वी राठोड हिचे अभिनंदन करून शूभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!