सेलूत दामिनी पथकाची नेमणूक; भाजपा महिला मोर्चाच्या मागणीला यश

0 115

 

सेलू, प्रतिनिधी – पोलीस अधीक्षक परभणी यांच्या आदेशानुसार सेलू पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासाठी दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.

dr. kendrekar

 

भाजपा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच याबाबत निवेदनाद्वारे दामिनी पथकाची मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे.

 

या दामिनी पथकात पो उ नी भाग्यश्री पुरी (९३५९४२८४४१),सुधाकर चौरे (९१४६३५९३८२), राहुल मोरे(८८०५०१३५८०) ,संजय सानप (९६०४५३५६९८)तसेच महिला पोलीस कर्मचारी सरिता कड९८८११४४६७०) व सुनीता व्यवहारे(९०२२९१४३११) यांचा समावेश आहे.

 

हे पथक शहरात फिरून रोडरोमिओचा बंदोबस्त करणार असून दररोज दोन वेळेस शहरातील शाळा व महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थीनीच्या अडचणी समजून घेणार आहे .तसेच शाळा व महाविद्यालय परिसरात कोणी रोडरोमिओ फिरतांना दिसल्यास त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करणार आहेत.

 

शहरात देखील महिलांना व मुलींना कोणी त्रास देत असेल किंवा छेडछाड करीत असेल तर त्यांनी वरील क्रमांकावर मोबाईल वर कळवावे त्यांचा त्वरित बंदोबस्त केला जाईल असे पोलीस प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. या पथकाच्या नियुक्ती मुळे विद्यार्थिनीचा जीव भांड्यात पडला असून त्यानी सुटकेचा श्वास घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाऱ्याच्या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. या पथकाच्या नियुक्ती मुळे भीती कमी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!