श्री क्षेत्र हिंगलाजनगर येथे आजपासून अश्विन नवरात्र महोत्सवास प्रारंभ

0 27

 

निफाड, रामभाऊ आवारे – निफाड तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र हिंगलाजनगर (खेडे) येथील श्री हिंगलाज माता मंदिर प्रांगणात आज सोमवार २६ सप्टेंबर २०२२ ते बुधवार ५ आक्टोबर २०२२ या कालावधीत श्री हिंगलाज देवी माता विश्वस्त व समस्त ग्रामस्थ खेडे आयोजित अश्विन नवरात्र महोत्सवास प्रारंभ होत आहे अशी माहिती श्री हिंगलाज देवी माता विश्वस्त व समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ खेडे यांनी दिली आहे.

 

दैनंदिन कार्यक्रमात सकाळी ६.३० वाजता देवी मातेची महापूजा, सकाळी ८ ते १० व दुपारी ३ ते ५ दुर्गा सप्तशती पाठ पठण, सायंकाळी ६.४५ वाजता महाआरती व दररोज रात्री ९ ते ११ हरी किर्तन होणार आहे.

 

किर्तनाची रुपरेषा पुढीलप्रमाणे —
सोमवार २६ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ९ ते ११ हभप पंडीत महाराज कोल्हे (खेडेकर), मंगळवार २७ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते ११ शिवचरित्रकार हभप गुरुदेव महाराज (कोपरगावकर), बुधवार २८ सप्टेंबर रोजी भव्य यात्रा महोत्सव, गुरुवार २९ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते ११ प्रतिसंत वैराग्य मुर्ती हभप तुकाराम महाराज (जेऊरकर) यांचे कीर्तन, शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी रात्री ९ ते ११ हभप संदिपान महाराज शिंदे (हासेगावकर), शनिवार १ आक्टोबर रोजी रात्री ९ ते ११ हभप एकनाथ महाराज चत्तर शास्त्री (पारनेर), रविवार २ आक्टोबर रोजी रात्री ९ ते ११ हभप अनिल महाराज पाटील (बार्शीकर), सोमवार ३ आक्टोबर रोजी रात्री ९ ते ११पारस महाराज जैन (बनोटीकर),४ आक्टोबर रोजी रात्री ९ ते ११ हभप उमेश महाराज दशरथे (मानवतकर) यांचे कीर्तन व ५ आक्टोबर रोजी विजया दशमी (दसरा) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

 

या नवरात्र महोत्सव कार्यक्रमात गायनाचार्य हभप रोहीदास महाराज मते,हभप प्रकाश महाराज सुरवसे (जळगाव),हभप मेधने सर,हभप गयाजी महाले,हभप सोमनाथ महाराज भुसारे व इतर १४ टाळकरी,मृदंगाचार्य हभप किरण महाराज गोसावी,हभप काशिनाथ दादा जेऊघाले,हभप विष्णु महाराज जेऊघाले आदींची साथ लाभणार आहे.

 

तरी पंचक्रोशीतील उगाव शिवडी,सोनेवाडी,थेटाळे निफाड, नांदुर्डी, देवपुर ,पंचकेश्वर ,रानवड ,नांदुर,वावी, सावरगाव, सारोळे खुर्द ,वनसगाव, ब्राह्मणगाव (वनस), खानगाव, खडक माळेगाव ,कोटमगाव आदी गावातील भाविकांनी या ज्ञानामृताचा लाभ घ्यावा असे आवाहन हिंगलाज माता देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव कोल्हे व पदाधिकारी यांनी केले आहे.

error: Content is protected !!