शिरसगाव लौकी येथे लाडक्या बैलाचा दशक्रिया विधी शोकाकुल वातावरणात संपन्न

0 53

 

रामभाऊ आवारे
निफाड,दि 20 ः
मुक्या प्राण्यांवर दया आणि अनोखं प्रेम करणारे मालक फारचं कमी असतात.परंतु समाजात माणूस हा माणसाचा दशक्रिया करतो.हे काय विशेष नसतं.परंतु माणसाने एखाद्या मुक्या प्राण्यांवर हृदयस्पर्शी प्रेम करून दशक्रिया विधी केल्याचं हे खर विशेष असतं म्हणूनच येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील‌‌ मुक्या प्राण्यांवर अतुट प्रेम करणारे शेतकरी भाऊराव मनाजी कानडे व राजु पाटील मनाजी कानडे‌ या दोन भावांच्या कुटुंबातील शंभो नावाच्या ‌‌बैलाचे गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी आकस्मित निधन झाले होते.
त्यामुळे लाडो नावाच्या कुत्र्याचे व शंभो नावाच्या बैलाचे एकमेकांवर खुप प्रेम होतं की‌ शंभो हा बैल कधी सुटून गेला तर शंभोचा कासरा तोंडात धरून घरी घेऊन येत असे.हा अतुट प्रेम करणारा लाडो नावाचा कुत्रा शंभोच्या निधनानंतर आजार झाला होता.‌परंतु डॉक्टरांनी सांगितले.याला काहीच झालेले नाही याच्यावर फक्त दुःख आहे.तुमच्या घरात काही घटना घडली का त्यावेळेस कानडे यांनी सांगितले की आमचा शंभो नावाच्या बैलाचे निधन झाले.तर कानडे कुटुंबातीलच एक सदस्य असल्याने शंभोचा आकस्मित मृत्यू आल्याने संपूर्ण कानडे कुटुंब हेलावून गेले होते.या बैलाचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम शनिवारी सकाळी 9 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.शंभो बैलाच्या आठवणींनी कुटुंबीय आणि गावातील ग्रामस्थ भावनिक होऊन‌ भाषणाद्वारे आठ्वणींना उजाळा देत होते.
‌शंभो बैलाची विक्रीसाठी मुडेगाव‌ येथील शेतकऱ्यांने‌ अडीच लाख रुपये किंमत केली होती.परंतु शंभो प्रचंड कष्टाळू,व बैलगाडा शर्यतीत चपळ असल्याने कानडे यांनी विक्री केला नव्हता.आपल्यावरील मालकाचे प्रेम हे कमी होऊ नये म्हणून मालकाला कधी शरमेने मान खाली घालु दिली‌ नाही.मालकाला कायमच शर्यती जिंकून ‌‌‌‌‌देत असल्याने समाधान मिळाल्याच्या आनंदात मालक खुश राहायचा परंतु जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला कधीतरी हे जग सोडून जावं लागतं असा या सृष्टीचा नियमच आहे.तसं ते कानडे कुटुंबातील शंभो नावाच्या ‌‌‌‌‌‌‌‌‌बैलाला ही लागू पडलं.या‌ दशक्रिया विधी निमित्ताने कानडे कुटुंबियांनी निधन झालेल्या जागी कायमस्वरुपी आठवण राहण्यासाठी वृक्षारोपण केले.दशक्रिया विधीसाठी उपस्थित असलेल्या जन-समुदायाला या कानडे परिवाराने जेवण दिले होते.

error: Content is protected !!