गंगाखेडला शुक्रवारी मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय तालुकाध्यक्ष मेळावा.

0 96

 

रामभाऊ आवारे
निफाड,दि 05ः
गंगाखेड येथे मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका अध्यक्षांचा मेळावा, वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार राज्यातील प्रत्येक विभागातून एक यानुसार आठ आदर्श तालुका संघांना  सन्मानित करण्यात येणार आहे.
सकाळी दहा वाजता राजेश्वर फंक्शन हॉल, देवळे जिनिंग परिसर येथे हा सोहळा संपन्न होत आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. आयबीएन लोकमतचे न्यूज अँकर विलास बडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्थानिक आ. रत्नाकर गुट्टे स्वागताध्यक्ष असतील अशी माहिती परिषदेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन व उपाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली. यावेळी आ.सुरेश वरपूडकर, आ.मेघनाताई बोर्डीकर, आ.राहूल पाटील, माजी आमदार  मोहन फड,राजेश विटेकर, परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, परिषदेच्या राज्य महिला संघटक जान्हवी पाटील,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातून किमान ५०० पत्रकार या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. मेळाव्या निमित्त स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यापुर्वी पाटण, नागपूर, वडवणी, पालघर, अक्कलकोट आदि ठिकाणी हा मेळावे झाले आहेत. यावेळी परिषदेचे पदाधिकारी मार्गदर्शन करतील. कोषाध्यक्ष विजय जोशी, प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, उपाध्यक्ष सुरेश नाईकवाडे, कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे आदी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागताध्यक्ष आ.रत्नाकर गुट्टे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मेळाव्यास पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख, परिषदेचे विभागीय सचिव प्रकाश कांबळे तसेच गंगाखेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पिराजी  कांबळे यांनी केले आहे.

error: Content is protected !!