हिंगणघाटमध्ये पत्रकार राजेश कोचर यांच्यावर हल्ला

0 244

हिंगणघाट,दि13 (प्रतिनिधी)ः
स्थानिक साप्ताहिक लोकचेतनाचे संपादक तथा पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष राजेश अमरचंद कोचर यांच्यावर  हिंगणघाट नगर पालीकेतील करविभागात ज्ञानेश्वर उर्फ प्रशांत एकनाथ राऊत, संत खंडोबा वार्ड यांनी वादावाद करुन हल्ला केला. यामध्ये राजेश कोचर यांना जबर दुखापत झालेली आहे.

याबाबत सविस्तर माहिती घेतली असता राजेश कोचर हे नगरपालिका येथे आपले कार्यालयीन कामानिमित्य दुपारी 12 वाजता गेले असता आरोपी ज्ञानेश्वर उर्फ प्रशांत राऊत यांनी कोचर यांना साप्ताहिक लोकचेतना पेपर मागितला तेव्हां त्यांनी पेपरची तारीख घेऊन माझे कार्यालयात ये मी तुला पेपर काढून देतो असा सांगत असतांनाच राऊत यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्कांनी कोचर यांना जबर मारहाण केली. यासंदर्भात हिंगणघाट पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी विरुद्ध भांदवी 324, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून राजेश कोचर यांना उपचारार्थ दवाखान्यात नेण्यात आले.
पत्रकार संघ हिंगणघाट चे अध्यक्ष हाजी मोहम्मद रफिक, प्रदीप आर्य, सचिव प्रदीपकुमार नागपुरकर, मुकेश चौधरी, रवी येनोरकर, सुरेंद्र बोरकर, केवलदास ढाले, मोहम्मद मलक नईम, शुभम कोचर, मोहसिन खान, आदी पत्रकारांनी ह्या घटनेचा निषेध नोंदवित पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांची भेट घेऊन या प्रकरणाविषयी कायद्यान्वेय कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

error: Content is protected !!