भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंतीनिमित्त अतुल वांदिले यांची विविध कार्यक्रमाना भेट

0 29

हिंगणघाट,( दि १५) (प्रतिनिधी)ः महामानव भारतरत्न,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतुलभाऊ वांदिले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अल्पोपहार कार्यक्रम शरबत वाटप कार्यक्रम असा विविध कार्यक्रमाला अतुल वांदिले यांनी भेट दिली.शहरात ढोलताशाच्या गजरात झाकीसह शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेचे स्वागत अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात करण्यात आलेयाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतुल वांदिले, अमोल बोरकर, जिल्हा सरचिटणीस दशरथजी ठाकरे, सुनील भुते, किशोर चांभारे, प्रवीण भुते, गोमाजी मोरे, सुधाकर वाढई, जावेद मिर्झा, रमेश चतुर, आकाश बोरीकर, परम बावणे, राहुल जाधव, नितीन भुते, दिनेश नगराळे,पंकज भट, अमोल मुडे, नरेश चिरकुटे, उमेश नेवारे, राजू मुडे, सुशील घोडे, विपुल वाढई, संजय गायधने, गजु महाकाळकर, बचू कलोडे, अनिल भुते, अरविंद ठाकरे, गोलू भुते, स्वप्नील पांडे, निखिल शेळके, राजू वाढई, मिथून चौहान, निखिल ठाकरे, नंदूकिशोर ढाले, कुणाल भुते, मनीष मुडे, आकाश भुते, सागर बारई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!