प्रा.सी.डी. रोटे क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र प्रतिमा क्रीडा गौरव पुरस्काराने सन्मानित

0 154

 

निफाड, रामभाऊ आवारे – मारुतीराव दगडुजी तिडके पाटील विद्यालय चासनळी तालुका कोपरगाव येथील पर्यवेक्षक प्रा सी डी रोटे यांना इमेज ऑनलाइन इंटरनॅशनल रिसर्च सेंटर यांचा कला, साहित्य, सामाजिक लोकसंवाद प्रतिमा संमेलन कोल्हापूर २०२१ तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल इंटरनॅशनल स्टार इमेज अवार्ड २०२१ महाराष्ट्र प्रतिमा क्रीडा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉ बी एन खरात व निवड समिती अध्यक्ष एन आर आखाडे कोल्हापूर यांनी दिली आहे.

दरवर्षी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्यासह इतरही राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडाक्षेत्र पत्रकारिता ,चित्रकार ,लेखक, कवी, समाज प्रबोधन, कला, आरोग्य तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.नाशिक जिल्ह्यातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा समावेश करून त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत पर्यन्त प्रेरित करणारे रुई तालुका निफाड येथील पर्यवेक्षक चिंधु दगू रोटे यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत झी मराठी – रात्रीस खेळ चाले या मालिकेतील मुख्य अभिनेते मा.माधव अभ्यंकर (अण्णा नाईक) यांच्या शुभहस्ते प्रकाश गायकवाड समाजसेवक तथा उद्योजक रायगड, निसार सुतार मॅनेजिंग डायरेक्टर हॉलीवुड ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज पुणे, अशोक आखाडे नृत्य प्रशिक्षक रत्नागिरी, विवेकानंद जितकर सुप्रसिद्ध पंचगव्य तज्ञ समिती सांगली, प्रवीण आलई समाजसेवक नासिक, स्वागत अध्यक्ष डॉक्टर बी एन खरात अध्यक्ष इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटर यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शाहू स्मारक सभागृह दसरा चौक ,कोल्हापूर येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न ‌‌झाला आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमात सहभागी पुरस्कारार्थी ना कोल्हापुरी फेटा, शाल,श्रीफळ ,सन्मान पत्र, सन्मानचिन्ह व मेडल देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात आले आहे.

प्रा सी डी रोटे यांना अद्याप पर्यंत विविध मान्यवरांच्या हस्ते २५१ राज्यस्तरीय व ११३ जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल जि प अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, आमदार आशुतोष काळे, जि प सदस्य डि के नाना जगताप, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णाताई जगताप, ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश कार्याध्यक्ष स्मिता कुलकर्णी, वंजारी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबुराव सानप, लासलगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास लाड, नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे संचालक काशिनाथ शिंदे ,निसाका संचालक एकनाथ डुंबरे , गणेश बँकेचे संचालक उमेश डुंबरे, वारकरी मंडळाचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय डुकरे, असणारी विद्यालयाचे प्राचार्य भोईर एस एस, मोरे सी जी, पी बी चौरे, स्कूल कमिटी अध्यक्ष साहेबराव पाटील तिडके, प्रकाश पाटील तिडके , भास्कर चांदगुडे, सतीश चांदगुडे मनीष गाडे, सिताराम आप्पा गाडे, ज्ञानेश्वर तासकर, केदारनाथ तासकर, भागवत वाघ, लक्ष्मण आवारे सर, राजेंद्र तासकर ,कैलास तासकर, पोलीस पाटील योगेश झुरळे, विनोद गायकवाड ,अंकुश तासकर, लखन तासकर, मोरे आर के, वैभव तासकर , विकास रायते, सुयोग गीते ,पोपटराव मोरे, धनंजय डुंबरे, प्रल्हाद डुंबरे, लासलगाव विकास संस्थेचे अध्यक्ष राजाबाबा होळकर, निसाका संचालक शिवाजी ढेपले, शिवसेना नेते प्रभाकर मापारी , दिग्विजय सेवाभावी संस्थेच्या सचिव सौ वैशाली डुंबरे, वनसगावचे सरपंच महेश केदारे, वनसगाव सोसायटी माजी चेअरमन संजय तोडकर, कोटमगावचे सरपंच तुकाराम गांगुर्डे, थेटाळे सरपंच सुनिल शिंदे, जयश्री बँकेचे मा चेअरमन छोटूकाका पानगव्हाणे, आर आर शिंदे, वनसगाव विद्यालयाचे प्राचार्य भागचंद निकाळजे, खडक माळेगाव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजुश्री रायते, उगाव विद्यालयाचे प्राचार्य कैलास गवळी, मुख्याध्यापक गोरखनाथ कुणगर, मगन केदारे , लासलगाव महिला दक्षता समितीच्या अध्यक्ष वेदिका होळकर आदींनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!