बाळासाहेबांची शिवसेनेच्या शहर अध्यक्षपदी पांडुरंग कावळे यांची नियुक्ती

0 62

सेलू,दि 04 (प्रतिनिधी)ः
वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार पांडुरंग कावळे यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सेलू शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांचे सहीचे नियुक्ती पत्र त्यांना हरिभाऊ काका लहाने यांच्या हस्ते देण्यात आले आहे .
शिवसेनाप्रमुखांचा हिंदुत्वाचा विचार व धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा प्रचार व प्रसार तसेच पक्षवाढीचीव जबाबदारी सर्वाना सोबत घेऊन पांडुरंग कावळे हे पार पाडतील असा विश्वास या पत्राद्वारे व्यक्त करण्यात आला आहे .
यावेळी विनायकराव खंडागळे ,पंडितराव अरकुले ,पवन घुमरे ,बंडू देवधर ,अविनाश शेरे ,विनायक रोडगे ,पारस काला आदींची उपस्थिती होती .

error: Content is protected !!