बशिरा खानम यांचा पहिला रोजा

0 95

सेलू,दि 15 (प्रतिनिधी)ः
येथील गुलमोहर कॉलोनी तील आठ वर्षिय बशिरा खान मोबिन खान याने त्यांच्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला.
रखरखत्या उन्हातील १४ तास विना अन्न पाणी न घेता या चिमुकल्यांनी आपला पहिला रोजा पुर्ण केल्याबद्दल हाजी अब्दुल रौफ,पठाण आमन खा,छोटे खा, जहिर बेग,हाजी निसार पठाण अनवर नवाब,इरफान जमीनदार,आखेब खान,अझर पठाण,शेख मोहसीन,अजिमखा यांनी त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. मुस्लिम समाजात रमजान हा सण अत्यंत पवित्र सण मानला जातो .व यामध्ये बहुतांश मुस्लिम बांधव रोज धरतात जवळपास १४ तास अन्न तर सोडाच पाण्याचा एक थेंब देखील न घेता हा रोजा पाळला जातो .सध्यातर उन्हाची तीव्रता वाढत असून त्यामध्ये पाणी न पिणे किती अवघड आहे .परंतु परमेश्वरावर अतूट श्रद्धा असल्याने हे रोजे पूर्ण केले जातात .मोठ्या व्यक्ती सोबतच या केवळ आठ वर्षाच्या बशीरा हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोज पूर्ण केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे .

error: Content is protected !!