सेलू पोलीस ठाण्याच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन

0 112

नारायण पाटील
सेलू ,दि 20 ः
येथील अत्यंत जीर्ण व धोकादायक बनत असलेल्या पोलीस स्टेशनच्या निजामकालीन इमारतीचे चित्र आता बदलणार असून ४ कोटीच्या कामाचा भूमिपूजन शुभारंभ नुकताच पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या शुभहस्ते पार पडला आहे .
शासनाने या इमारत बांधकामासाठी ४ कोटीची तरतूद केली आहे .
गेल्या कित्येक दिवसापासून या जीर्ण झालेल्या इमारतीमधूनच संपूर्ण तालुक्याच्या संरक्षणाचा कारभार चालू होता .गेल्या डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन च्या बांधकामाना मजुरी मिळाली होती
परंतु त्यात सेलू पोलीस स्टेशन चा समावेश नव्हता .सेलू पोलीस स्टेशन ची जीर्ण व धोकादायक इमारत लक्षात घेता या इमारतीचे बांधकाम होणे अत्यंत गरजेचे होते .याबाबत परभणीच्या पोलीस अधीक्षक आर .रागसुधा यांनी ग्रहविभाग मुबंई ,यांचेशी संपर्क साधल्यामुळे या कामाला मंजुरी मिळाली असून भूमिपूजन देखील संपन्न झाले आहे .
या चार कोटीच्या निधीत दोन मजली इमारतीत स्वागत कक्ष ,पोलीस निरीक्षक कक्ष ,अद्ययावत कार्यालय ,पोलीस उप निरीक्षकाचे स्वतंत्र कक्ष ,आरोपीसाठी पुरुष व महिला लॉकअप ,कर्मचारी कक्ष,अभिलेख कक्ष ,विश्रांती कक्ष ,स्नानगृह ,शौचालय आदींचा समावेश असून पार्किंग देखील सोय केली जाणार आहे .
नवीन इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत जुन्याच इमारतीत काम चालणार आहे .

error: Content is protected !!