रोप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या “नितीन चषक “च्या खेळपट्टीचे भूमिपूजन

0 71

 

सेलू, नारायण पाटील – येथील नितीन कला,क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त २१ ते २९ जानेवारी या कालावधीत नूतन महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर होणाऱ्या निमंत्रीताच्या राज्यस्तरीय ” नितीन चषक ” या स्पर्धेच्या खेळपट्टीचे भूमिपूजन आज दि १२ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

 

यावेळी अध्यक्षस्थानी मा. आ . हरिभाऊ लहाने तर माजी नगराध्यक्ष पवन आडळकर , पंडितराव अरकुले ,जयप्रकाश बिहानी ,नंदकिशोर बाहेती ,नामदेव अप्पा डख यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती .राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज , राष्ट्रमाता जिजाऊ ,स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले .
यावेळी गिरीष लोडया ,संदीप लहाने ,पारस काला ,पवन घुमरे ,पांडुरंग कावळे ,संजय लोया ,राजेश लोया ,गणेश माळवे ,नागेश कान्हेकर ,बंडू देवधर ,अविनाश शेरे ,बाबासाहेब मोळे ,अमोल मिटकर ,प्रतीक काळे ,ऍड अशोक अँभुरे पाटील ,प्रदूमन पवार ,सय्यद दिलावर, बाबा काटकर ,अनिल शेळके ,दिलेश जाजू ,परमेश्वर राऊत ,दत्तराव झोल ,गौतम कनकुटे ,प्रमोद सांगतांनी आदींची उपस्थिती होती .
प्रास्ताविकात गिरीष लोडया यांनी स्पर्धेची माहिती देऊन सहकाऱ्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

यावेळी बोलतांना हरिभाऊ लहाने म्हणाले की गेल्या २३ वर्षांपासून या स्पर्धाचे आयोजन केले जाते व सर्वांच्या सहकार्यानेच या स्पर्धा यशस्वी होतात .व या स्पर्धेचे रोप्य महोत्सवी वर्ष देखील निश्चितच साजरे केले जाईल.या स्पर्धेचे उदघाटन २१ जानेवारी रोजी नामदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते होणार असून पारितोषक वितरण सोहळ्यासाठी सहकार मंत्री ना .अतुल सावे उपस्थित राहणार आहेत.
जयप्रकाश बिहानी ,नंदकिशोर बाहेती ,पंडितराव अरकुले यांनी देखील मनोगतात या स्पर्धेस शुभेच्छा देऊन स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मोहन बोराडे यांनी केले .

error: Content is protected !!