साळापुरीत विकासकामांचे आमदार सुरेश वरपुडकरांनी केले भूमिपूजन व लोकार्पण

0 129

परभणी,दि 10 (प्रतिनिधी)ः
साळापुरी ता.परभणी येथील डांबरीकरण रस्ता भूमिपूजन व श्री साळेश्वर मंदिराच्या सभागृहाचे लोकार्पण पाथरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुरेश वरपूडकर  यांच्या हस्ते करण्यात आले.
साळेश्वर मंदिराच्या सभागृहाची गावकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी मागणी केली होती. गावासाठी हे सभागृह महत्त्वाचे असल्याने 25/15 अंतर्गत 20 लक्ष रुपये निधी आमदार  सुरेश वरपूडकर यांनी उपलब्ध करून दिला होता. यातुन भव्य स्वरूपाच्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
तसेच साळापुरी ते दैठणा या रस्त्याच्या डांबरीकरणाचे भुमीपुजन   वरपूडकर  यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी साळापुरी गावाचे सुपुत्र  प्रविण उध्दवराव घाटगे यांची वसंतराव नाईक मराठवाडा पतपेढीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मा श्री सुरेशरावजी वरपूडकर साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रम प्रास्ताविक परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेशराव घाटगे यांनी तर सुत्र संचालन  श्रीकृष्ण घाटगे   यांनी केले.
भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रम अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष  रामभाऊआप्पा घाटगे हे उपस्थित होते.यावेळी धोंडीरामजी चव्हाण(माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद परभणी) ,अशोकराव इक्कर, उदयसिंह कच्छवे (सरपंच दैठणा), राजाराम कच्छवे, राहुल कच्छवे, रंगनाथ कच्छवे, राजेभाऊ कच्छवे, गजानन कच्छवे, डॉ फारुख भाई तसेच गावातील जेष्ठ व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!