सेनेला मोठा धक्का, ‘या’ खासदाराचं ‘जय महाराष्ट्र’; शिंदे गटाच्या बंडात सहभागी

0 338

 

कोल्हापूर – केवळ निष्ठा आणि भावनिकेतेवर राजकारण करता येत नाही, सत्तेबरोबर राहून विकास करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे खासदार मंडलिक यांनी शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde gat) गटात जावे असा आग्रह त्यांच्या कार्यकर्त्यांनी धरल्याने तेही बंडात सहभागी झाले. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरणारे कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिकच (MP Sanjay Mandlik latest news) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात डेरेदाखल झाले आहेत, त्यामुळे सेनेला मोठा धक्का बसला आहे.

 

 

कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक विचार करून मतदारसंघाला भरीव निधी मिळवून देण्याच्या दृष्टीने आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे, अशी मागणी मंडलिक समर्थक गटाने केली. हमिदवाडा कारखान्यावर रविवारी (१७ जुलै) मंडलिक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही आग्रही भूमिका मांडण्यात आली. तसेच निर्णयाबाबतचे सर्वाधिकार खासदार मंडलिक यांना देण्यात आले.

 

 

मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. विरेंद्र मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा झाला. यावेळी अध्यक्षस्थानी अतुल जोशी होते. जिल्ह्याच्या राजकारणात सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चाच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यातील भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.

 

 

“लोकसभा निवडणुकीनंतर करोना महामारी आणि महापुराच्या कारणाने खासदारांचा निधी गोठवल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सामोरे जाताना जनतेपुढे निधीतून उभारलेली विकास कामे दाखवावी लागणार आहेत. राज्यात शिंदे यांचे सरकार तर केंद्रात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील गावांच्या विकास निधीसाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी रहावे,” अशी भावना प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना आणि ठाकरे घराणे याविषयीची कृतज्ञतेची भावनाही व्यक्त करायला कार्यकर्ते विसरले नाहीत.

error: Content is protected !!