केजरीवालांना कोरोना होताच मोठा निर्णय,दिल्लीत विकेण्ड लॉकडाऊन

0 93

वाढती कोरोना रुग्ण संख्या आणि ओमायक्रॉनचा धोका या पार्श्वभुमीवर दिल्लीत वीकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता राजधानी दिल्ली शनिवारी आणि रविवारी आठवड्यातून दोन दिवस पुर्णपणे बंद राहणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढे सिसोदिया म्हणाले की, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरुच काम करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर खाजगी कार्यालय क्षमतेच्या 50% सुरु राहतील. दिल्लीत सोमवारी 4099 कोरोना रुग्ण आढळले होते. दिल्लीत रुग्ण सक्रिय होण्याचा प्रमाण हा 6.46% इतका आहे.

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयात रुग्णाचे भरती होण्याचे प्रमाण वाढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे जैन म्हणाले.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोना

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोना झाला आहे. केजरीवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. संसर्ग झाल्याची माहिती मिळताच त्यांनी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. अरविंद केजरीवाल पंजाब आणि उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाचा प्रचार करत आहेत. सोमवारी केजरीवाल यांनी डेहराडूनमध्ये सभा घेतली होती. यादरम्यान त्यांनी मास्क घातला नव्हता.

केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, त्यांना संक्रमणाचे सौम्य लक्षण आहेत आणि सध्या ते घरीच क्वारंटाइन झाले आहेत. केजरीवा यांनी आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

9 महिन्यानंतर मिळाले सर्वात जास्त संक्रमित रुग्ण
मुंबईमध्ये सोमवारी कोरोना संक्रमणाचे 8,082 नवीन प्रकरणे समोर आले. जे 18 एप्रिल 2021 नंतर एका दिवसाचा सर्वाधिक स्तर आहे. या दरम्यान आजारामुळे अजून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान ओमायक्रॉनचे 40 नवीन प्रकरणे समोर आले आहेत. ज्यामुळे महानगरात ओमायक्रॉन संक्रमितांची संख्या वाढून 368 झाली आहे. मुंबई महानगरपालिकेनुसार, आता शहरात 8,07,602 कोरोना संक्रमित आहेत. तर मृतांची संख्या वाढून 16,379 झाली आहे. 8,082 नवीन प्रकरणांमधून 7,273 (90 टक्के) मध्ये आजाराचे लक्षण नव्हते आणि केवळ 574 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 71 रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहे.

error: Content is protected !!