शिवसेनेसमोर मोठी अडचण- उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार..आता पुढे काय?

1 201

शिवसेनेसमोर अडचणी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. एकीकडे धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आली आहे. त्यामुळे अवघ्या 12 दिवसांमध्ये यावर कसा तोडगा निघणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

शिवसेनेसमोर अडचणी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. एकीकडे धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आली आहे. त्यामुळे अवघ्या 12 दिवसांमध्ये यावर कसा तोडगा निघणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
पुन्हा कार्यकारिणीची बैठक घेऊन संघटनात्मक निवडणुकांसाठी शिवसेनेची आयोगाला विनंती करणार आहे. 2018 मध्ये कार्यकारणीच्या बैठकीत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची दुसऱ्यांदा निवड झाली होती. मात्र, मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान या मुद्यावर निवडणूक आयोगाचा कुठलाच प्रतिसाद नव्हता. आता पुढच्या सुनावणीमध्ये तरी दिलासा मिळणार का याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीनं निवडणूक होते. वर्षानुवर्षे ही निवडणूक होत आली आहे. १९६६ पासून शिवसेना रजिस्टर्ड पक्ष आहे. १९६६ नंतर सर्व निवडणूका शिवसेनेनं लढवल्या आहेत. १९८९ मध्ये निवडणूक आयोगाकडून चिन्ह मिळालं. लोकशाहीच्या मुल्याप्रमाणे निवडणूक झाल्या आहेत, अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.

राजकीय पक्ष आणि विधिमंडळ सदस्य यावर युक्तीवाद झाला. शिंदे गटाकडून विधिमंडळ सदस्यांवर भर देण्यात आला. तोच ग्राह्य धरावा असं त्यांनी सांगितलं. पण कार्यकर्ता, पदाधिकारी असणे म्हणजे, पक्ष हे आमचं म्हणणं आहे. २०१८ मध्ये लोकशाहीची मूल्य तुडवली गेली किंवा एकाधिकारशाही आहे हे त्याचं म्हणणं धादांत खोटं आहे. पण निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन, सर्व प्रक्रिया पार पाडूनच कार्यवाही केली. त्या संदर्भात सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे, अशी माहिती देसाई यांनी दिली.

प्रतिनिधी सभा, त्यात किती सदस्य त्यांचे नंबर काय हे सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. राजकीय पक्ष म्हणून काय आहात हे निवडणूक आयोगानं विचारलं होतं. त्यासाठी दस्ताऐवज आम्ही अगोदरच दिलं आहे, असंही देसाईंनी सांगितलं.

error: Content is protected !!