पोलीस भरतीत मोठा घोटाळा, उमेदवारांऐवजी अन्य युवकांनी दिली परीक्षा; आणि भरतीसाठी उमेदवारांकडून…

0 107

नागपूर – सन 2021 च्या अखेरच्या तीन महिन्यात नागपुरात जी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यात उमेदवारांच्या जागी वेगळ्याच लोकांनी शारीरिक आणि लेखी परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक संपूर्ण टोळीच अशा पद्धतीला उमेदवारांना पास करून देण्यासाठी खोटी लोक परीक्षेत बसवत असल्याचा हा प्रकार आहे. शहर पोलीस दलाच्या भरतीत मूळ उमेदवारांऐवजी अन्य युवकांनी परीक्षा दिली. भरती प्रक्रियेतील हा घोळ समोर आल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे.

पोलीस भरती मध्ये घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. हे तिघंही औरंगाबाद (Aurangabad) येथील आहेत. त्यामुळे पोलीस भरती (Police Recruitment ) घोटाळ्यात औरंगाबाद कनेक्शन असल्याचं पुढे आलं आहे. 2021 अखेरच्या तीन महिन्यात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या परीक्षेत उमेदवारांकडून 12 ते 15 लाख रुपये घेण्यात आले. ज्यांनी पैसे दिले त्यांच्या लेखी आणि शारीरिक परीक्षेला वेगळ्याच उमेदवाराने बसविण्यात आल्याचा प्रकार उघसकीस आला आहे. ही टोळी उमेदवाराला पास करून देण्यासाठी बोगस उमेदवाराचा (Fraud Candidate) वापर करत होती. (Nagpur Police recruitment scam)

परीक्षा झाल्यानंतर शारीरिक आणि लेखी परीक्षेत व्हेरिफिकेशन करताना पोलिसांना अर्ज भरलेल्या उमेदवाराचा चेहरा आणि परीक्षार्थींच्या चेहरा यातला फरक लक्षात आला आणि तपास सुरू झाला. सध्या असे पाच उमेदवार लक्षात आले आहे की ज्यांच्या जागी भलत्याच कोणीतरी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. या टोळीतील इतर सदस्य, तसेच खोटे उमेदवार परीक्षेत बसवणारे आणि पुढे पोलीस होऊ पाहणारे तरुण, यांचा आकडा तपासात वाढू शकतो. तसेच ही टोळी किती काळापासून आणि कुठं-कुठल्या परीक्षांमध्ये सक्रिय होती हे सर्व प्रश्न आहेतच.

error: Content is protected !!