तरुणाच्या आत्महत्येनंतर मंत्री शंकरराव गडाखांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

0 100

शब्दराज ऑनलाईन,दि 03 ः
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याशी संबंधित असलेल्या अहमदनगरच्या दंत महाविद्यालयातील क्रमचारी प्रतिक काळे या तरुणानं आत्महत्या केलीय. 30 ऑक्टोबर रोजी प्रतिक काळेनं आत्महत्या केलीय. महत्वाची बाब म्हणजे प्रतिक काळे याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप तयार केली होती. त्यात त्याने 10 जणांची नावं घेतली आहेत. त्या नावांमध्ये मंत्री शंकरराव गडाख यांचं आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचंही ही नाव असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय.

शंकरराव गडाखांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा- उपाध्ये

प्रतिक काळे या तरुणाने 10 नावं घेतली. त्यातील 7 नावांवर एफआयआर दाखल केली. त्यातील 3 नावांवर मात्र पोलिसांनी आळीमिळी गुपचिळी साधली. जलसंधारण खातं सांभाळणाऱ्या शंकरराव गडाख यांच्यासारख्या नेत्याचं नाव घेऊन एक तरुण आत्महत्या करतोय. 30 तारखेला ही घटना घडलीय. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात अत्यंत अस्वस्थ वातावरण आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीची चर्चा तिथे सुरु आहे. हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय, असा गंभीर आरोप उपाध्ये यांनी केलाय.

संच प्रतिक बाळासाहेब काळे याला न्याय मिळणार की नाही? हा आमचा पहिला प्रश्न आहे. ते सत्ताधारी पक्षाचे, शिवसेनेचे मंत्री आहेत म्हणून ते काहीही करु शकतात, अशी त्यांची भूमिका आहे का? त्यामुळे प्रतिक काळेला न्याय द्यायचा असेल तर मंत्री शंकरराव गडाख यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. कारण ते मंत्रिपदावर असल्यामुळे प्रतिक काळेनं नाव घेऊनही गडाख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे गडाख यांना पदावरुन दूर केल्याशिवाय या प्रकरणात न्याय मिळणार नाही, अशी आक्रमक भूमिका केशव उपाध्ये यांनी मांडलीय.

नेमकं प्रकरण काय?

अहमदनगरमधील प्रशांत गडाख यांच्या दंत महाविद्यालयात काम करणाऱ्या प्रतिक काळे यानं चार दिवसांपू्र्वी औरंगाबाद रोडवरील झाडीत आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडीओ व्हायरल करत आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. प्रतिक काळे हा काही वर्ष प्रशांत गडाख यांचे सहाय्यक म्हणून काम पाहिल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी अहमदनगरच्या MIDC पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील 4 जणांना पोलिसांनी अटक केल्याचीही माहिती आहे.

बाळासाहेब मुरकुटे आक्रमक
वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुक्यातील नेते संजय लक्ष्‍मण सुखदान यांच्यावर मंत्री गडाख अन्याय करत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने सोमवारी नगरमध्ये आंदोलन केले. त्यामध्ये माजी आमदार मुरकुटे हेही सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी झालेल्या ‘वंचित’च्या नेत्यांनीही मंत्री गडाख यांच्यावर जोरदार टीका केली.

आता या प्रकरणात भाजपने उडी घेतली आहे. गडाख यांच्याविरोधात नगरमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनात माजी आमदार मुरकुटे यांनी याही प्रकरणाचा उल्लेख करून चौकशीची मागणी केली आहे. मुरकुटे यांनी म्हटले आहे की, काळे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांवर दबाव आहे. काळे यांनी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये जलसंधारण मंत्री गडाख, त्यांच्या पत्नी, तसेच भाऊ विजय गडाख यांचीही नावे घेतली आहेत. त्यामुळे या प्रकरणी गडाख यांची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री गडाख यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत नेवाशाचे माजी आमदार मुरकुटे यांनी गडाख कुटुंबावर अनेक आरोप केले. गडाख कुटुंबातील एका महिलेने गेल्या वर्षी आत्महत्या केली होती, त्याचाही उल्लेख करून मुरकुटे यांनी त्याचे पुढे काय झाले, असा सवाल उपस्थित केला.

error: Content is protected !!