शाळा व्यवस्थापन समितीकडून शाळेला सहा हजार रुपये किमतीची पुस्तके भेट

0 77

 

 

सेलू, प्रतिनिधी –  भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून  जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा डासाळा येथे  वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने उपक्रम घेण्यात आला .

dr. kendrekar

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुशील शिखरे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष श्रीमती सारिका शामराव गजमल या होत्या .यावेळी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या विषयी मुलांनी भाषणे केली व मुख्याध्यापक श्री मधुकर काष्टे यांनी  जागतिक  हात धुणे दिनाचे महत्त्व स्पष्ट केले व प्रात्यक्षिक दाखवले .

 

श्रीमती विजया देशपांडे यांनी एपीजे अब्दुल कलाम यांच्या बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली . यावेळी कार्यक्रमाच्या  उपाध्यक्षा सारिका शामराव गजमल यांनी शाळेला अनमोल असे  3300 रुपये किमतीची पुस्तके  भेट दिली .  विद्यार्थ्यानी 22 पुस्तके तर शिक्षकांनी व ग्रामस्थांनी 24 पुस्तके शाळेला भेट देऊन साने गुरुजी वाचनालय समृद्ध केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदाशिव मुळी, करीम सय्यद ,पुष्पा नवले, दिपा रायबोले, शितल बोरसे ,कीर्ती आंबेकर यांनी परिश्रम घेतले  तर  श्रीमती ज्योती भागवत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

error: Content is protected !!