31 जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

0 18

नवी दिल्ली – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन Budget session ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. 66 दिवसांत 27 बैठका होणार आहेत. अधिवेशनाची सुरुवात लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाने होणार आहे.

 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे. विद्यमान सरकारचा हा अखेरचा अर्थसंकल्प ठरणार आहे.

 

dr kendrekar 11

अधिवेशनाच्या सर्व 66 दिवसांत सर्वसाधारण सुट्टीसह 27 बैठका चालणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. अमृत काल दरम्यान राष्ट्रपतींचे अभिभाषण, केंद्रीय अर्थसंकल्प आणि इतर बाबींवर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी उत्सुक आहोत. वर्ष 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, 14 फेब्रुवारी ते 12 मार्च या कालावधीत सुट्टी असेल, जेणेकरून विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समित्या अनुदानाच्या मागण्यांचे परीक्षण करू शकतील आणि त्यांच्या मंत्रालये आणि विभागांशी संबंधित अहवाल तयार करू शकतील.

error: Content is protected !!