कार – ट्रॅक्टर ट्रोली धडक, दोन पोलिस जागीच ठार तर दोन जखमी
भोकर, गंगाधर पडवळे – दि.9/1/2022 रोजी रात्री अंदाजे 9 वाजेच्या सुमारास पोलीस कर्मचारी नावे (1)दिपक देवानंद जाधव ब.न.3374 ने.पो.मु.नांदेड संलग्न कंट्रोल रुम (2)ईश्वर सुदाम राठोड ब.न.2727 ने.पो.मु.नांदेड (दोघे मयत)व जखमी पो.कर्मचारी (1)प्रितेश ईटगाळकर ब.न..2853
(2)सदानंद सपकाळ ब.नं.234 ने.पो.मु.नांदेड हे त्यांच्या एका मित्राच्या निमंत्रण निमित्ताने रा.भोकर यांच्याकडे जेवणाचा कार्यक्रम उरकून इंडिका कार नंबर MH-26-V-1868 ने भोकरवरुन नांदेडकडे जात असताना भोकर ते नांदेड रोडवरील खरबी शिवारात रस्त्याने जाणाऱ्या उसाचा ट्रक्टर नंबर MH-26-AR-1156 चे ट्रॉलीला मागून धडक दिली आहे. यात ईश्वर सुदाम राठोड व दिपक देवानंद जाधव दोघे ने.पो.मु.नांदेड हे जागीच मयत झाले असून,सदानंद सपकाळ व प्रितेश ईटगाळकर ने.पो.मु.नांदेड हे गंभीर जखमी झाले आहे.
त्यांना वैद्यकीय उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. मयताचे शव ही पुढील कारवाईसाठी भोसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आली आहे. अपघातग्रस्त वाहनांच्या आजुबाजुला सुरक्षाव्यवस्था केली आहे. पुढील योग्य ती कारवाई करीत आहोत,अशी माहिती पोलीसांकडून मिळते आहे..