नूतन विद्यालय खडक माळेगाव येथे संविधान दिन उत्साहात साजरा

0 148

निफाड,दि 26 (प्रतिनिधी)ः
नुतन विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित नूतन विद्यालयात ‘ माझे संविधान माझा अभिमान ‘ या उपक्रमांतर्गत श्री मदगे पी.डी. यांनी संविधानाचे महत्व व उद्देशिका या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ रायते एम.बी. अध्यक्षस्थानी होत्या. भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वे, अधिकार , हक्क व सर्वसमावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावे तसेच घटनेतील मूलभूत तत्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा संपूर्ण परिचय होणे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरीता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ‘माझे संविधान माझा अभिमान’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आणि या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या स्पर्धांचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यालयात चित्रकला, रांगोळी ,घोषवाक्य स्पर्धा,निबंध स्पर्धा, घेण्यात आल्या या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला .भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला प्रदान केलेल्या भारतीय संविधानातील मौलिक तत्वे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारे आहेत संविधानातील मुलतत्वे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे आणि त्यांना जागरूक नागरिक बनविणे याकरीता संविधानाची माहिती असणे व संविधानाच्या मूलतत्त्वांचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे.
तसेच सदर कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी गुंजन भोसले हिने उद्देशिकाचे वाचन केले. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक -शिक्षकेतर बंधू- भगिनी उपस्थित होते .

error: Content is protected !!