सेलु उपजिल्हा रुग्णालयात परिचारिका दिन उत्साहात साजरा

0 113

सेलू,दि 12 (प्रतिनिधी)ः
शहरातील उपजिल्हा रुग्णालयात जगातल्या पहिल्या परिचारिका फ्लोरेंस नाइटिंगल (12 मे 1820 -13 ऑगस्ट 1910 ) यांचा
जन्मदिवस हा परिचारिका (दिन १२ मे गुरुवार )म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांनी उपजिल्हा रुग्णालयात संपूर्ण परिचारकांचा पुष्पगुच्छ देऊन तर सुनीता राठोड आणि एस.एस. पाटील यांचा विशेष सत्कार केला. या प्रसंगी आपल्या मनोगतात सुनिल गायकवाड म्हणाले की माणसाने असे कार्य करावे की आपल्या अनुपस्थित आपले नाव निघाले पाहीजे फ्लोरेंसे नाइटिंगल यांनी असे कार्य केल्यामुळेच आपल्याला आज त्यांचा जन्मदिवस हा परिचारका दिन म्हणून साजरा करावा लागत आहे.सर्व परिचारकाताई यांना शुभेच्छा देऊन त्यांनी सत्कार केला.
उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डाॅ. संतोष चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डाॅ. संतोष देशमुख,डाॅ. शेख(सहायक अधीक्षक अधिकारी) सेविका सुनीता राठोड, ईंचार्ज सिस्टर एस. एस. पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, विजय चौधरी, दिपक बनसोडे, तसेच उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी संदेश उजागरे, अजिंक्य गायकवाड, अजिंक्य परिट ,सतीश कांबळे, शिल्पा साळवे,ब्रम्हा निशा, पारवेकर, विशाल काकडे ,आशिष बचाटे ,स्वप्नील पवार, कोमल सोनवणे ,मुक्ता गुट्टे, हरिश उखरडे, राणी साबळे, विकास चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!