सेलूत कापसाने गाठला दहा हजाराचा टप्पा

0 83

सेलू,दि 04 (प्रतिनिधी) ः कृषी उत्पन्न समिती सेलूच्या मार्केट यार्ड मध्ये आज दि ४ जानेवारी रोजी कापूस खरेदी दरात वाढ झाली असून प्रति क्विंटल १००००/- चा टप्पा गाठला आहे .या लिलावामध्ये कापूस खरेदीदार रामेश्वर राठी, गोपाळ काबरा,आशिष बिनायके,निर्मल भाई,प्रसाद फायबर,ग्लोबल कॉटन,स्वस्तिक कॉटन आदी खरेदी दारांनी सहभाग नोंदवला . यामध्ये बाजार समितीचे मुख्य प्रशासक रणजीत गजमल,इतर प्रशासक व सचिव राजीव वाघ यांची देखील आवर्जून उपस्थिती होती .कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची बाजार समिती कडून दखल घेतली जात आहे .
शेतकऱ्यांनी देखील चांगला भाव मिळावा यासाठी उच्च प्रतिचा व कचरावीरहीत कापूस विक्री साठी आणावा .तसेच सोबतच बँक पासबुक व आधार कार्ड ची झेरॉक्स आणावी म्हणजे गैरसोय होणार नाही असे आवाहन रणजित गजमल व राजीव वाघ यांनी केले आहे .

error: Content is protected !!