120 व्या दिवशी पेट्रोल पंप हटाव कृती समिती हिंगणघाट तर्फे साखळी उपोषण!

0 21

हिंगणघाट (वर्धा),दि 12 (प्रतिनिधी)ः
120 व्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पासुन जिल्हा पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने,जिल्हा पोलिस प्रशासन तथा पोलिस वेल्फेअरच्या पेट्रोल पंपची जागा,जिल्हाधिकारी प्रशासनाने स्थलांतरित करावी या मुख्य मागणी साठी,सिव्हील लाईन वर्धा येथील  डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात, हिंगणघाट पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने गोरख भगत,अशोक भाले, अनिल मून, गोकुल पाटील, रवींद्र भगत, कुणाल वासेकर, विक्रांत भगत, रस पाल शेंद्रे भारत बोदिले विनोद गोडघाटेयांच्या नेतृत्वामध्ये साखळी उपोषण करण्यात आले
वर्धा सिव्हील लाईन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला लागून उभारण्यात आलेल्या पोलिस वेल्फेअर व जिल्हा प्रशासन स्तरिय पेट्रोल पंपची जागा स्थलांतरित करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी महाविकास आघाडी सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,गृहमंत्री यांना निवेदन दिले.या परिसरातील विद्रुपीकरण थांबवा.अन्यथा संविधानिक मार्गाने आम्ही यापेक्षाही तीव्र असे जेल भरो आंदोलन करु , असा इशारा यावेळी देण्यात आला कृती समितीचे निमंत्रक अनिल मून यांनी माहिती दिली
——————

error: Content is protected !!