Viral Video : विद्यार्थ्यांचा निव्वळ धुमाकूळ, जळगावच्या गॅदरिंगमधला तुफान व्हायरल व्हिडीओ पहा

0 430

 

खान्देशातील अनेकांना “है झुमका वाली पोर” (है झुमका वाली पोर) hai jhumka wali por गाण्यात खूप रस आहे. लग्न, वाढदिवस, शालेय कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांमध्ये हे गाणे लोकप्रिय होत आहे. मात्र, गाणे वाजू लागले की अनेकजण सोबत डान्स सुरू करतात. हे गाणे सध्या सोशल मीडियावर शेअर होत असून, लोक त्याचा आनंद घेत आहेत.

 

जळगाव जिल्ह्याच्या युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अभिलाषा रोकडे यांनीदेखील संबंधित व्हिडीओ शेअर केलाय. “खान्देशी गीतांची आज वाढती लोकप्रियता पाहून मनाला खूप आनंद देऊन जाते. ही लोकप्रियता पाहता गाणे हे खान्देशातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खान्देशी गीतांचा डंका वाजविला जात आहे. लग्न असो किंवा कुठलाही समारंभ खानदेशी गीतांशिवाय पूर्णच होत नाही. त्याचे ज्वलंत उदाहरण नुकत्याच झालेल्या धरणगाव येथील एका शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात”, असं अभिलाषा म्हणाल्या आहेत.

 

पाहा व्हिडीओ :

 

सध्याच्या घडीतलं सर्वात प्रसिद्ध अहिराणी गाणं – हाई झुमका वाली पोर (hi jhumka vali por)
अहिराणी गाण्यांमध्ये सध्या लोकप्रिय आणि प्रसिद्ध झालेल्या गाण्यांमध्ये ‘हाई झुमका वाली पोर’ या गाण्याने खूप भाव खाललाय. खान्देशात वाढदिवसाचा कार्यक्रम असो, लग्न असो किंवा हळदीचा कार्यक्रम असो, कोणताही कार्यक्रम असो, हे गाणं नाही वाजलं तर त्या कार्यक्रमात मजाच नाही. विशेष म्हणजे फक्त अहिराणीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात या गाण्याचे चाहते आहेत. त्यामुळे अवघ्या महिन्याभरात लाखो प्रेक्षकांनी यूट्यूबवर हे गाणं पाहिलं आहे.

error: Content is protected !!