पंढरीच्या तहसील कार्यालयाचा अनागोंदी कारभार, शिधापञिकेसाठी चार महिन्यापासून नागरिकांचे हेलपाटे

0 224

 

पंढरपूर – पंढरपूर-सांगोला विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष , भंडीशेगाव येथील रहिवाशी सावता राक्षे यांनी येथील काही नागरिकांची कागदपत्रे नवीन शिधापञिका तसेच संजय गांधी निराधार योजनेसाठी संबंधित विभागात जमा केली होती. वारंवार कार्यालयात विचारणा केली असता पंडित कोळी व अर्चना मागाडे यांच्याकडून अरेरावीची भाषा वापरुन ऊडवाऊडवीची ऊत्तरे राक्षे यांना दिली जात आहेत , यासंबंधी त्यांनी ऊपविभागीय अधिकारी यांच्याशी पञव्यवहार केला होता, त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही , शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवले आहे.

१ डिसेंबर अखेर योग्य ती कार्यवाही न झाल्यास संघटनेच्या वतीने पंढरपूर मध्ये आमरण ऊपोषण करणार असल्याची माहिती सावता राक्षे यांनी दिलीय.
शिधापञिकेला आधार संख्या जोडण्यासाठी कागदपत्रे जमा केली जात आहेत , नोव्हेंबर २०२० मधील आधार जोडणीचे काम चालु असुन सध्या स्वीकारण्यात येत असलेल्या अर्जासाठी सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागेल अशी माहिती पुरवठा विभागातून मिळत आहे. त्यासाठी इंटरनेट सेवा हळुवारपणे चालत असल्याचे कारण दिलं जात आहे. एकंदरीत पंढरीच्या तहसील कार्यालयात अनागोंदी कारभार चालु असून वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालण्याची मागणी सावता राक्षे यांनी केली आहे.

error: Content is protected !!