कर्नल समीर गुजर यांचा कल्याण नगरमध्ये सत्कार

0 74

परभणी,दि 17 (प्रतिनिधी)ः
महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत दि. 31 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना शासनामार्फत अनुदान देण्यात येते. या गौरव पुरस्कारास अनुसरून परभणी येथील कर्नल समीर बळवंत गुजर यांना ‘मेन्शन इन डिस्पॅच’ हे पदक बहाल करण्यात आले याबद्दल कल्याण नगर-शिवराम नगर वासीयांच्यावतीने कर्नर समिर गुजर यांचा शनिवार (दि.17) सत्कार करण्यात आला.
यावेळी दिलीपराव वडकुते,दिपक गिराम,कंत्राटदार अमित वडकर,पप्पु हट्टेकर,प्रा.मुंढे,बाळु यादव,नंदु परदेशी,संजय साखरे राजू वसेकर दयानंद जमशेठे,पत्रकार कैलास चव्हाण आदी उपस्थित होते.
कर्नल समिर गुजर यांचा परिचय
भारतीय सैन्य दलातील गढवाल रायफल 19 व्या बटालियन प्रमुख म्हणून कर्नल श्री समीर गुजर यांचा व त्यांच्या बटालियनचा केंद्र सरकारतर्फे बहुमुल्य पदक बहाल करून त्यांचा सन्मान करुन बक्षीस देण्यात आले आहे.  मागील दोन वर्षात जम्मु काश्मीरमध्ये बटालियन असलेल्या ठिकाणी पाकिस्तान बॉर्डरवर त्यांनी नवीन इतिहास घडवला आहे. त्याठिकाणी मागील दोन वर्षात एकाही भारतीय सैनिकाचे नुकसान (प्राणहानी) न होता, त्यांनी पाकिस्तानी सैनिक व येथील अतिरेकी कारवाया करणारे व त्या भागात केलेल्या दहशतवादी कारवाया तडीस न जाऊ देता, हेतू साध्य न होऊ देता त्यांचा खात्मा केला. आजपर्यंत तेथे भारतीय सैन्याची हानी होत होती व पाकिस्तानी सैन्याचा हेतू साध्य होत होता, हे त्यांनी मागील दोन वर्षात मोडीत काढत भारताची विजयी पताका त्याठिकाणी फडकवत ठेवली, ते पण भारतीय सैन्याची कोणतीही प्राण हानी न होऊ देता, यामुळे सैन्याचे मनोबल वाढले आहे, अशी देशसेवा करणारे महान कर्नल समीर गुजर हे आपल्या परभणीचे भूमिपुत्र आहेत. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण परभणीतच झालेले आहे. बालविद्या मंदिर शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या समीर गुजर यांची 12 वी सायन्सनंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) प्रवेश परीक्षेद्वारे निवड झाल्यानंतर त्यांनी पुण्यात खडकवासला येथे 4 वर्षे प्रशिक्षण घेतले. त्यांनी पायदळात आतापर्यंत 22 वर्षे सेवा केली आहे. या काळात सर्व बॉर्डर्सवर कर्तव्य बजावले आहे. युनिट-19 गढवाल रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. सध्या त्यांची पोस्टिंग पुणे आर्मी हेड क्वार्टरला आहे. 2004 मध्ये मणिपूर येथे 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालून केलेल्या कामगिरीबद्दल समीर गुजर यांना शौंर्यपदक मिळालेले आहे. काश्मीरमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आर्मी युनिटने उत्तम कारवाई केली. या चकमकीत 2 दशहतवादी आणि 6 पाकिस्तानी सैंनिकांचा खात्मा करुन शत्रुंच्या अनेक चौक्या उध्वस्त करण्यात आल्या. याच अतुलनीय कामगिरीसाठी ‘मेन्शन इन डिस्पॅच’ हे पदक बहाल करण्यात आले आहे.

error: Content is protected !!