पंचायत समिती विभागाकडून घरकुल लाभार्थ्यांची हेळसांड,आर्थिक व्यवहार होत असल्याच्या तक्रारी

0 40

आनंद बलखंडे
आखाडा बाळापूर,दि 30ः
रमाई,शबरी व प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शेकडो घरकुले मंजूर झालेली आहेत परंतु त्यात पंचायत समिती विभागा कडून 70 टक्के लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळालेला नाही.
अनेक गरीब लाभार्थ्यांनी घराची मोडतोड केली ,अन त्यात पावसाळा सुरू झाला ,गेले सहा महिन्यांपासून रमाई आवास योजनेचा निधी सरकारने उपलब्ध करून दिलेला नाही .तो निधी देण्याची मागणी सुद्धा वारंवार करण्यात आलेली आहे.
त्यात प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी गेल्या तीन महिन्या पासून प्राप्त झालेला आहे.प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी उपलब्ध असताना सुद्धा काही मोजक्या व दलाला मार्फत काम करणाऱ्या मोजक्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले,बाकी इतर शेकडो लाभार्थी मात्र प्रतीक्षेत असून घरकुल विभागात चकरा मारताना दिसत आहेत.
मागील काही वर्षात लाभ घेतलेल्या काही लाभार्थ्यांची नावे डबल आली आहेत. त्याची चौकशी करण्याचे काम चालू असल्याचे कारण सांगितले जात आहे,परंतु मोजक्या नावे शोधण्या करिता सहा महिने लागतात कसे असा सवाल लाभार्थी करत आहेत.चिरीमिरी दिली की लागलीच खात्यावर रक्कम कशी जमा होते असेही लाभार्थी नागरिक प्रश्न विचारत आहेत.
या बाबत वरिष्ठ अधिकारी यांचेकडे चौकशी च्या काही तक्रारी दाखल झाल्या असून नूतन गटविकास अधिकारी यांनी या बाबत चौकशी चे आदेश दिल्याचे कळते.
परंतु निर्दोष लाभार्थ्यांची हेळसांड जाणीवपूर्वक होत असताना दिसत आहे.

error: Content is protected !!