ससेवाडी येथे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

अशोक वाडकर यांच्यावर काँग्रेस पक्षाची जबाबदारी सोपवणार :-आमदार संग्राम थोपटे.

0 261

नसरापूर,दि 07 (प्रतिनिधी):-
अशोक वाडकर यांचा काँग्रेस पक्षात मान जपला जाईल, आगामी काळात त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येईल .काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी सक्रिय कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. त्याच पद्धतीने अशोक वाडकर हे भोर तालुका काँग्रेस पक्षाला लाभलेला उमदा व सक्रिय कार्यकर्ता आहे, असे प्रतिपादन भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
भोर तालुक्यातील ससेवाडी येथे काल काँग्रेस आय पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.यावेळी वेळू गणातील शिवसेनेचे संघटक अशोक वाडकर यांचे सह अनेक कार्यकर्ते यांनी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. आमदार संग्राम थोपटे यांनी सत्कार करून पक्षात स्वागत केले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष देविदास भन्साळी, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंगजी चव्हाण पाटील, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजयजी बालगुडे व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर ,भोर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपटराव सुके,शिवाजीराव जांभूळकर, संजय उभे,गोपाळराव मस्के, भोर ,वेल्हा ,मुळशी विधानसभा युवक अध्यक्ष राहुल जाधव,मुळशी बाजार समितीचे मा. सभापती संतोष साखरे, भोर पंचायत समितीचे उपसभापती रोहन बाठे ,बाजार समिती उपसभापती सोमनाथ निगडे, ससेवाडी सरपंच पूनम गोगावले, हिरामण पांगारे व भोर तालुका खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती,आणि राजगड सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक , उपसभापती मा. संचालक, विविध गावचे सरपंच ,उपसरपंच ,सदस्य, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले ,तर प्रास्ताविक भोर तालुका काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष व माजी सरपंच ज्ञानेश्वर माऊली पांगारे यांनी केले ,तर उपस्थितांचे स्वागत बाळासाहेब गोगावले यांनी केले, तर आभार हरिभाऊ वाडकर यांनी मानले.

error: Content is protected !!