शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये संविधानीक मूल्यांचा समावेश करावा-सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची मागणी

0 9

शब्दराज ऑनलाईन,दि 25 ः
शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये संविधानीक मूल्यांचा समावेश करण्याची मागणी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना संविधानातील मुलभूत अधिकार, मुलभूत कर्तव्ये व मार्गदर्शक तत्वे यांची माहिती व ज्ञान मिळणे आवश्यक आहे. यामुळे भारताचे सुजान नागरिक बनविण्यास मदत होते. संस्कारक्षम वयात अर्थात इ. ५ वी ते इ. १० वी च्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय राज्यघटनेतील विविध प्रकारच्या विषयांचा इयत्ता निहाय समावेश टप्याटप्याने करावा यासाठी हे निवेदन देण्यात आले. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संबंधाने तत्काळ बैठक लावण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या प्रसंगी अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र प्रभारी मनोज बागडी तसेच रमेश कांबळे, गौतम आरकडे ,राजेश लाडे, राहूल साळवे हे ही उपस्थित होते.

error: Content is protected !!