पाण्याचा पुरवठा दूषित होत असल्याने त्याची तात्काळ चौकशी करण्यात यावी–अतुल वांदिले राज्य उपाध्यक्ष मनसे

0 24

हिंगणघाट-वर्धा, प्रतिनिधी – तालुक्यातील शेकापूर बाई येथे नियमित दूषित पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत असल्याने मनसे राज्य उपाध्यक्ष ‘अतुल वांदिले’ यांच्यासह गावकऱ्यानी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

शेकापूर बाई हे हिंगणघाट तालुक्यातील मोठं गाव आहे इथे ग्रामपंचायत असून गावामध्ये दोन पाणी पुरवठा जलसंभ आहे परंतु गावकर्यांनी पाण्याच्या टाक्याची पाहणी केली असता त्यामध्ये गाळाचा साठा निर्माण झाला आहे, मरण पावलेले पक्षी, बंदराची विष्ण, लोखंडी रॉड, कचरा-काडी व टाकीला झाकण नसलेल्या अवस्थेत आहे.

गेल्या सहा ते सात महिन्यापासून पाण्याचा टाक्या साफ केलेल्या नाही गांवातील पाईप लाईन लिंकेज असल्याने पाईप मधून सांडपाणी वाहत आहे त्यामुळे विविध रोगांना आमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे.

अशा प्रकारे संपूर्ण गावाला दूषित पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे गावात साथीचे रोग मोठया प्रमाणात वाढत आहे आणि डेंगू सारखे पॉझिटिव्ह रुग्ण सुद्धा वाढत आहे या संपूर्ण प्रकरणाकडे ग्रामपंचायती चे दुर्लक्ष आहे या सर्व बाबीची आमच्या कडे व्हिडीओ क्लिप सुदधा आहे.

तरी आपण याची सखोल चौकशी करून ग्रामपंचायत कर्मचारी व कमिटी यांचे निलंबन करण्यात यावे व बरखास्त करण्यात यावी यासाठी आम्ही गावकर्यांच्या वतीने आपणास निवेदन सादर करत आहो यावर तात्काळ चौकशी करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शेकापूर बाई गावकरी आक्रमक आंदोलन करणार असे मनसे राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले यांनी तहसीलदार यांना निवेदन देताना सुनावले.

यावेळी मनसे राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले, जिल्हासचिव सुनील भुते, वाहतुक सेना जिल्हा उपाध्यक्ष बचू कलोडे, शहर अद्यक्ष राजू सिंह, रामचंद्र तिजारे ,दामोदर झाडे ,राहुल तिजारे ,पुंडलिक कुंभलकर ,पद्माकर तिजारे ,पवन तडस, भोला, वर्धनी संदीप मेघा, अंकुश संजय ,अरविंद रोहित कळस ,प्रशांत राजकुमार कोरेवार,, अरविंद ,आकाश तिजारे ,मधुकर कोळसे ,राजेंद्र की , की टाकरे,महेश सुपारे,हनुमान तिजारे, राजेंद्र वाढई ,दिनेश तिजारे, पांडुरंग शिवणकर ,भोला वादा चांदोरे ,चंदू चंदूभाई, भाऊ हवे ,हरिचंद आलूके कारे धनराज खोलसे विजय गुडदे, गणेश शिवणकर, मधुकर कोळसे, विजय गुडदे, गणेश शिवणकर ,संतोष कांबळे, विकी राऊत, राहुल तिजारे ,दामोदर झाडे, पुरुषोत्तम शेंडे, बापू कमलकर ,संदीप मेगरे ,कुंडलिक कुंभलकर ,रोहित जावेद शेख याची उपस्थिती होती.

शेकापूर (बाई) या गावात दूषित (गढूळ) पाण्यामुळे गावातील अनेकांना साथीचे रोग, डेंगू मोठ्या प्रमाणात होत आहे याला जवाबदार कोण?
-अतुल वंदिले, राज्य उपाध्यक्ष मनसे

error: Content is protected !!