देशात 2 दिवसांत कोरोनाची प्रकरणे दुप्पट, मागील दिवसाच्या तुलनेत 44% जास्त; अनेक ठिकाणी निर्बंधात वाढ

0 139

शब्दराज वेब टीम – बुधवारी देशात 13,000 हून अधिक कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा मंगळवारच्या तुलनेत 44% जास्त आहे. मंगळवारी देशात ९,१९५ कोरोना रुग्ण आढळले. दैनंदिन नवीन प्रकरणे अवघ्या दोन दिवसांत दुपटीने वाढली आहेत.

जगभरामध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Omicron variant) चांगलीच चिंता वाढवली आहे. आता भारतात देखील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ (Coronavirus) होताना दिसत आहे. मागील २४ तासामध्ये भारतात १३१५४ नव्या कोरोना (Corona) बाधितांची नोंद झाली आहे.

मागील २४ तासामध्ये भारतात १३१५४ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर २६८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच कोरोनाच्या ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत मध्ये वाढ होताना दिसत आहे. देशात मागील २४ तासामध्ये २६३ ओमायक्रॉन (omicron) बाधितांची नोंद झाली आहे. यामुळे देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या ९६१ इतकी झाली आहे. ओमायक्रॉन बाधितांची सर्वाधिक संख्या ही दिल्ली (Delhi) आणि महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) आहे. दिल्लीमध्ये ओमायक्रॉन बाधितांची संख्या २६३ इतकी आहे, तर महाराष्ट्रामध्ये २५२ इतकी आहे.

अनेक ठिकाणी निर्बंधात वाढ
महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज गुरुवार 30 डिसेंबर ते 7 जानेवारी 2022 पर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. पोलिसांनी 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, बार, पब, रिसॉर्ट्स आणि क्लबसह कोणत्याही बंद किंवा खुल्या ठिकाणी नवीन वर्षाचे उत्सव, पार्ट्या करण्यास बंदी घातली आहे.

राजस्थान मंत्रिमंडळाने ३१ जानेवारीनंतर सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी लसीकरण अनिवार्य केले आहे. यासोबतच रात्रीच्या कर्फ्यूची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मॉल्स आणि इतर व्यावसायिक आस्थापने दररोज रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असेल.

डेहराडूनमध्ये प्रवेशासाठी, लसीचे डोस किंवा कोविड निगेटिव्ह अहवाल या दोन्हींचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. अहवालाचा कालावधी 72 तासांपर्यंत ठेवण्यात आला आहे म्हणजे केवळ 72 तासांतील अहवालाचा विचार केला जाईल.

error: Content is protected !!