नूतन महाविद्यालयात कोरोना लसीकरण बूस्टर डोस आणि स्वामी रामानंद तीर्थ स्मृतिदिन साजरा

0 84

सेलू, प्रतिनिधी – नूतन महाविद्यालय सेलू, इंद्रधनुष्य सेवाभावी संस्था व उपजिल्हा रुग्णालय सेलू यांच्यावतीने दि. 22 जानेवारी रोजी कोरोना लसीकरण बूस्टर डोस आणि स्वामी रामानंद तीर्थ स्मृतिदिन दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुण्या उपविभागीय अधिकारी सौ अरुणा संगेवार म्हणाल्या की प्राध्यापक व शिक्षक यांना फ्रन्टलाइन वर्कर असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या सानिध्यात येत असल्यामुळे त्यांच्यासाठी कोरोनाची प्रतिबंधात्मक लस आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. कोठेकर सचिव नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू, सौ अरुणा संगेवार उपविभागीय अधिकारी सेलू डॉ. शरद कुलकर्णी कार्यकारी कार्यकारी मंडळ सदस्य नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू डॉ. जनार्धन गोळेगावकर वैद्यकीय अधिकारी, गजानन वाघमारे शिक्षण विस्तार अधिकारी, प्रा. डॉ महेंद्र शिंदे प्राचार्य नूतन महाविद्यालय सेलू डॉ. उत्तम राठोड उपप्राचार्य नूतन महाविद्यालय सेलू प्रा.नागेश कान्हेकर पर्यवेक्षक, दयानंद जामगे समन्वयक उपस्थित होते.

यावेळी नूतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा नवनियुक्त संचालक मंडळाचे सदस्य डॉक्टर शरद कुलकर्णी यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.व्ही. के. कोठेकर सर म्हणाले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी लढा उभारला होता, त्यानंतर आता या कोरोनाच्या काळात आपण सर्वांनी मिळून जो कोरोना विरोधात लढा उभारला आहे .आणि या लढ्यामध्ये सहभागी असलेले डॉक्टर, पोलीस, शिक्षक, प्राध्यापक, वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी या सर्वांनाच आता प्रतिबंधात्मक लसी ची अत्यावश्यकता आहे. या प्रतिबंधात्मक लसीनंतरच आपला हा लढा पूर्ण होईल. असे प्रतिपादन यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. प्राचार्य डॉ. महेंद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. जी. घुलेश्वर आणि प्राध्यापिका सुषमा सोमानी यांनी केले. आभार प्रा.प्रसाद पांडे यांनी मानले. डॉ. एस. एन .पद्मावत यांनी इंग्रजी विषयांमध्ये सरकार कडून ऑस्ट्रेलियन पेटंट ची मान्यता मिळाल्या बदल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंद्रधनुष्य सेवाभावी संस्थांचे अध्यक्ष गणेश माळवे यांचे सहकार्य लाभले व त्यासोबतच उपजिल्हा रुग्णालय सेलू वैद्यकीय अधीक्षक डॉ.जर्नाधन गोळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय कदम, अनिकेत घेवारे, आशा तांबोळकर, जना मुंडे त्याचप्रमाणे प्रा. मिलिंद झमकडे, विलास खरात, प्रा. महेश कुलकर्णी प्रा. उमाकांत हेसे, विरेश कडगे यांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!