परभणीत शिवसेनेच्या अभेद्य गडाला तडा

उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे शिंदे गटात दाखल

0 421

 

 

परभणी, दि.31(प्रतिनिधी) : गेल्या अठरा वर्षांपासून आपण भगव्यासह हिंदुत्वाकरीता जीवाचं रानं केलं. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रस्थापितांच्या विरोधात आंदोलने करीत अनेक केसेस अंगावर घेतल्या. दुर्देव, त्याच काँग्रेसजणांच्या सोबत काम करण्याची वेळ आपणावर येवून ठेपली. ती गोष्टच आपल्या जिव्हारी लागणारी ठरली, अशी खंत व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती कोंडी फोडून घेतलेल्या धाडशी निर्णयाने आपण प्रभावीत झालो आहोत. त्यामुळेच त्यांचे समर्थन करत भगव्यासह हिंदुत्वासाठी आपण या पुढे समर्पित भावनेने काम करण्याचे ठरवले, असल्याचे मत शिवसेनेचे विधानसभा तथा उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे यांनी व्यक्त करीत शनिवारी (दि.30) शिंदे गटात प्रवेश केला. यानिमित्ताने शिवसेनेच्या अभेद गडाला तडा बसला आहे.

अनेक वर्षांपासून या राज्यातील शिवसैनिक हा अस्वस्थतपणे जगत होता. दिशाहीन असा शिवसैनिकांचा प्रवास सुरु होता. प्रत्येकाच्या मनात एक अस्वस्थता होती. तीच अस्वस्थता ओळखून आपण शिवसैनिकांचे तारणहार बनला आहात, असे मत व्यक्त करीत पोंढे यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या पत्राद्वारे व्यक्त करीत शिवसेना प्रमुखांच्या विचारांची शिवशाही आपण आणली आहे, त्यामुळेच शिवसैनिक व सर्वसामान्य जनता ही आनंदी आहे. त्यांच्याच या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी आपण दाखल झालो आहोत.

 

शिवसेनाप्रमुखांनी स्थापन केलेल्या शिवसेना-भाजप युतीचे सरकार आपण पुन्हा सत्तारुढ केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार, असेही पोंढे यांनी या पत्रातून म्हटले.

error: Content is protected !!