ओमिक्रॉनचा धोका..आता परभणी जिल्ह्यात येण्यापुर्वी होणार कोरोना चाचणी

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची पत्रकार परिषदेत माहिती

0 1,046
परभणी,दि 29 (प्रतिनिधी)ः
दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घालणार्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या कोरोना विषाणूचे संंभाव्य संकट लक्षात घेता महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सुचनांंची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून परजिल्ह्यातून येणार्या प्रवाशांची आरटी-पीसीआर केली जाणार असून यासाठी मंगळवार (दि.30) पासून जिल्हा हद्दीवर 8 चेकर्पॉईट तर परभणी शहरासाठी 6 चेक पॉईटसची व्यवस्था केली असून बसस्थानक, रेल्वेस्थानकांवर तपासणीसह लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, अप्पर पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, मनपा आयुक्त देविदास पवार आदी उपस्थित होते.
कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा व तातडीने कामाला लागा. लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील. विदेशातून, परप्रांतातून तसेच परजिल्ह्यातून येणार्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी झालेल्या बैठकीत दिले असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. त्यानुसार प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. व्यापारी, नागरिकांनीही कोरोना नियमांचे पालन करावे, उल्लंघन केल्यास व्यक्तीस 500 रुपये दंड व संस्था किंवा आस्थापनांना 10 हजारापर्यंत दंड होवू शकतो, असेही श्रीमती गोयल यांनी स्पष्ट केले आहे.
error: Content is protected !!