सेलू शहरातील दर्गाह हजरत सय्यद शाहबुद्दीन यांच्या उरुसाला प्रारंभ

0 29

सेलू,दि 05  ( नारायण पाटील)
शहरातील कामील अवलिया हझरत सय्यद शाह शाहबुद्दीन व हझरत सय्यद बुर्हानुद्दीन यांच्या उरूसाला आज दिनांक 5 जुन सोमवार पासुन प्रारंभ झाला असून उरुसा निमित्त प्रती वर्षा प्रमाणे या ही वर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
यामध्ये दिनांक 5 जुन सोमवार रोजी संध्याकाळी असर नमाझ नंतर दर्गेला गुसल स्नान करण्यात आले आहे .
6 जून मंगळवार रोजी नमाझ ए झोहर नंतर दर्गे पासुन शहरात संदल काढण्यात येणार असून या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सेलूचे उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवर , तहसिलदार दिनेश झांपले, सेलू पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, आदींची उपस्थिती राहणार आहे .
7 जुन बुधवार रोजी नमाझ ईशा नंतर दर्गेत कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे 8 जुन गुरुवार रोजी नमाझ ए फज्र नंतर तक्सीम तब्रुख गोड जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे उरूसा निमित्त आयोजीत सर्व कार्यक्रमात भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दर्गेचे मुत्वल्ली सय्यद कबीर सय्यद अमीर, उरुज लाला, अबरार बेग, सय्यद झुबेर, सय्यद खदिर, सह आदींच्या वतीने करण्यात आले आहे

error: Content is protected !!