ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं निधन

सात दशकांच्या राजेशाहीला बकिंगहॅम पॅलेस पोरका

0 122

लंडन : ब्रिटिश सत्तेचा सुवर्णकाळ आणि अस्ताला जाणाऱ्या साम्राज्याच्या साक्षीदार असलेल्या, ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके विराजमान असणाऱ्या ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं आज वृद्धपकाळानं निधन झालं. त्या 96 वर्षांच्या होत्या. स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसल या ठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला.

 

प्रिन्स फिलिप यांचं त्यांच्या 100व्या वाढदिवसाच्या केवळ काही आठवडे आधी निधन झालं होतं. त्यानंतर वयाच्या 96 व्या वर्षी महाराणी एलिजाबेथ यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे इंग्लंडवर शोककळा पसरली आहे. सारे नागरिक दु:खात आहेत. सर्वाधिक काळ इंग्लंडच्या महाराणी पदावर राहिल्याचा मान त्यांना मिळाला आहे.

 

एलिझाबेथ यांचा जीवन प्रवास
21 एप्रिल 1926 झाली लंडनमध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म झाला. 20 नोव्हेंबर 1947 रोजी ग्रीक आणि डेन्मार्कचे राजकुमार प्रिन्स फिलिप यांच्याशी त्यांचा शाही विवाह झाला. 1945 साली त्या ब्रिटीश सैन्यात महिला विभागात दाखल झाल्या होत्या. 14 नोव्हेंबर 1948 रोजी त्यांचा पहिला मुलगा प्रिन्स चार्ल्स याचा जन्म झाला.

 

6 फेब्रुवारी 1952 रोजी वडील किंग जॉर्ज यांच्या मृत्यूनंतर त्या महाराणी झाल्या. 2 जून 1953 रोजी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यांना महाराणीचा मुकुट घालण्यात आला. 21 जून 1982 रजी त्यांचा नातू प्रिन्स विलियम याचा जन्म झाला. 6 फेब्रुवारी 2012 रोजी 60वर्षे पूर्ण केली म्हणून हिरक महोत्सव साजरा करण्यात आला. 9 सप्टेंबर 2015 साली इंग्लंडवर सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या त्या पहिल्या महिला सम्राज्ञी ठरल्या. एप्रिल 2020 मध्ये देशाला कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 9 एप्रिल 2020 रोजी त्यांचे पती पिन्स विल्यम्स यांचा मृत्यू झाला.

error: Content is protected !!