झाला निर्णय… मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद

0 1,223

करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने जारी केला आहे. या कालावधीत या इयत्तांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहे. मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही घोषणा केली.

मुंबईत शाळा बंद निर्णय!

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय ठरु लागला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगितलं जातंय. पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत अखेर निर्णय घेतलाय. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन (Online) शाळा या सुरु राहणार आहेत. मात्र शाळांचे ऑफलाईन (Offline) वर्ग बंद राहणार आहेत.

राज्यातील शाळांबाबतही निर्णय शक्य?

आजच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आजच किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचाही आढावा घेतला होता. आजपासून लहान मुलांचं लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. एकीकडे आता मुंबईत शाळांबाबत जो निर्णय घेण्यात आला आहे, तशाप्रकारचा निर्णय राज्यातील इतरही जिल्ह्यांतील शाळांबाबत घेतला जातो का, याकडे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय.

रविवारी विक्रमी रुग्णवाढ!

रविवारी मुंबईत (Mumbai) तब्बल 8 हजार 63 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस मुंबईवरील कोरोनचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. शनिवारीही मुंबईत 6 हजार 347 रुग्ण आढळून आले होते, गेल्या काही दिवसात थोडा दिलासा मिळाला होता, मात्र आता पुन्हा आकडेवारी वाढल्याने धाकधूक वाढली आहे.

यात एक दिलासादायक बाब म्हणजे रविवारी एकाही कोरोनाबाधिताचा मुंबईत मृत्यू झाला नव्हता. कोरोनाची दुसरी लाट धिरोदात्तपणे हाताळलण्यानंतर आता महाराष्ट्रात (Maharashtra ) तिसऱ्या लाटेचे ढग गडत होत आहेत. रोज रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे चिंता वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे नवे रुप म्हणजेच ओमिक्रॉनबाधित (Omicron)  रुग्णदेखील वाढत असल्याचं समोर आलं आहे.

error: Content is protected !!