देगलूर ‘लोहमार्ग’ मंदावला?

0 444

नांदेड, गजानन जोशी – गत अनेक वर्षांपासून नांदेड – देगलूर – बिदर असा लोहमार्ग निर्मिती प्रकल्प मंजूर झाल्याविषयी वारंवार सर्वच राजकीय पक्षांकडून वल्गना केल्या गेल्या. परन्तु गत ३०,३५ वर्षांपासून प्रलंबित असलेला लोहमार्ग पूर्ण कधी होणार?

नांदेड – कहाळा – नायगाव – नरसी – देगलूर – बिदर हा लोहमार्ग मंजूरी फक्त निवडणुकीच्या काळातच होते,निवडणूक झाली की सत्ताधारी व विरोधक सर्वचजणांना याचा विसर पडतो,असे अद्याप तरी समोर आलेले आहे.

आताच पार पडलेल्या निवडणुकीपूर्वी मा.खासदार यांनी नांदेड ते देगलूर हा लोहमार्ग मंजूर झाला लवकरच भू संपादन होणार असल्याबाबत सांगितले होते,परन्तु ते केव्हा पक्ष सोडतील याची शाश्वती नसल्याने व अनेकवर्षांपासून हेच ऐकत आल्याने जनतेनेही जास्त विश्वास ठेवला नाही,त्यामुळे लोहमार्ग मंजुरी विषय “लांडगा आला रे आला” यासारखी झाल्याचे नागरिकांतून चर्चिले जाते आहे.

तसेच विद्यमान खासदार याबाबत पाठपुरावा करत असल्याचे समजते परन्तु कितपत यश मिळेल सांगता येत नाही,कारण या निवडणुकीत याच मतदारसंघात भाजपला अपयश आल्याने केंद्र/राज्य याठिकाणची सर्व मंडळी जिल्ह्याचे नेते व पदाधिकारी यांच्यावर नाराज असल्याचे समजते. त्यामुळे हा लोहमार्ग २०२४ पर्यंत पूर्ण होणार! की अजून एका निवडणुकीदरम्यान मला निवडून द्या मी लोहमार्ग मंजूर करून दाखवतो हेच जनतेला ऐकावे लागणार.? सद्यस्थितीत “देगलूर लोहमार्ग मंदावला?” असे व्यापारी व सुजाण नागरिकांतून चर्चिले जाते आहे….

माजी मुख्यमंत्री यांनी तर सत्ता असताना जनतेला आश्वासने देऊन फक्त मेहुण्याला लोकसभेत निवडून आणण्याचे काम कायम करत आले. व ही विधानसभा आरक्षित असल्याने भावनात्मक विषय निर्माण करत जनतेला विश्वासात घ्यायचे व नेहमीप्रमाणे विश्वासघात करायचा या उपर या मतदारसंघात काहीच झाले नाही.
-एक संतप्त देगलूरकर

‘जिल्ह्याच्या विकासाला आशेचे किरण’
प्रशासकीय सेवेला विराम देत राजकारणात प्रवेश केलेले रामदास पा.सुमठाणकर यांच्यावर देगलूरकरांचा ठाम विश्वास असल्याने,हा प्रकल्प शेवटास तेच पोचवू शकतील असे जाणवते,कारण सद्यस्थितीत राज्यातील पक्षश्रेष्ठी व बिदरचे खासदार व केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या निकटवर्तीय असल्याने हा प्रश्न राज्य/केंद्र स्तरावरील नेत्यांकडील पाठपुराव्यामुळेच पूर्ण होईल अशी जनतेला अपेक्षा आहे.

error: Content is protected !!