फेसबुकवर “परभणी लोकसभा” नावाने बनावट आयडी करून राकाँची बदनामी करणाऱ्यावर कारवाईची मागणी

0 38

पाथरी, रमेश बिजुले – फेसबुकवर “परभणी लोकसभा” नावाने बनावट आयडी तयार करून परभणी राकाँची बदनामी करणा-याचा शोध घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी पाथरी शहर आणि ग्रामिण भागातील पदाधिका-यांनी पाथरी पोलीस निरीक्षकांना मंगळवार २४ जानेवारी रोजी निवेदन देऊन त्यात ‘परभणी लोकसभा’ नावाने फेक आयडी कार्यरत असून त्यावर परभणी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलीन करण्याचे काम केले जात असल्याचे म्हटले आहे.

 

 

संबंधीत फेक आयडी धारक हा पाथरी शहरातीलच असून तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा विरोधातील असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.या फेक आयडी मुळे पाथरी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. त्या मुळे सदरील फेक आयडीवर तातडीने कार्यवाही करून तो आयडी तात्काळ बंद करण्यात यावा व संबंधीत आयडी धारकावर योग्यती कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

 

 

या निवेदनावर हन्नान खान दुर्रानी,अलोक चौधरी,सुनिल उन्हाळे,एकनाथराव शिंदे,गोविंद हरकळ,महेंद्र गायकवाड,दिलीप लांडगे,मधूकर काळे,अहेमद अत्तार,सतिष वाकडे,प्रशांत क्षिरसागर,अनिल गालफाडे,प्रमोद ढवळे,राजेंद्र टोके,प्रशांत चौधरी,अमोल टरपले,नारायन पितळे,सुनिल पितळे,विलास माथेले,मुख्तार अली,एजाज,खान,मुख्तार अली,राजेश पाटील आदी मोठ्या संखेने राकाँच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या स्वाक्ष-या आहेत.

error: Content is protected !!