धनंजय मुंडेंना झटका, पोटगी देण्याचा आदेश

1 402

मुंबई,दि 06 ः
मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरले आहेत. करुणा शर्मा यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणातील जी तक्रार केली होती. त्यातील आरोप मान्य करण्यात आले आहेत. वांद्रे फॅमिली कोर्टानं हा निर्णय दिला आहे. करुणा शर्मा यांनी केलेले आरोप मान्य केले आहेत. वांद्रे फॅमिली कोर्टाच्या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये द्यावे लागणार आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय,  करुणा मुंडे या फॅमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि १,२५,००० रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

करुणा मुंडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला त्या म्हणाल्या, मी १५ लाख प्रति महिना पोटगी मिळावी म्हणून मागणी केली होती. मात्र न्यायालयाने दोन लाख पोटगी देण्याचा निर्णय घेतला आहे. पोटगी वाढवून मिळण्याबाबत उच्च न्यायालयात अपील करणार आहे.

करुणा मुंडे पुढे म्हणाल्या की, मागच्या तीन वर्षांपासून मी खूप त्रास भोगला आहे. फक्त पोटगीसाठी मला खूप संघर्ष करावा लागला. पतीशिवाय एका महिलेले जीवन जगणे खूप अवघड असते. आपला पती जेव्हा उच्च पदावर असतो, तेव्हा पूर्ण व्यवस्था त्याच्याबाजूने काम करत असते. त्यांच्याकडे मोठ मोठे वकील होते. तरीही मी ही लढाई लढली. माझ्या वकिलांनी प्रामाणिकपणे लढून मला न्याय मिळवून दिला, याबद्दल मी त्यांचेही आभार मानते.

मी पत्नी आहे, हे न्यायालयात सिद्ध

खटल्याबाबत माहिती देताना करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांची मी पत्नी आहे की नाही? हे आधी आम्हाला सिद्ध करावे लागले. जे आमच्या वकिलांनी सिद्ध करून दाखवले आहे.

कोर्टाने आदेशात काय म्हटलय?

1) धनंजय मुंडेंवर करुणा शर्मांनी केलेले आरोप कोर्टाकडून अशत: मान्य.

2) प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार करु नये.

3) धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांना महिन्याला 2 लाखाची पोटगी द्यावी.

4) या खटल्याचा 25 हजाराचा खर्च धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांना द्यावा.

error: Content is protected !!