आखाडा बाळापूर ग्रामपंचायतचे बनावट शिक्के वापरून प्रमाणपत्राचे वाटप ;गुन्हा दाखल होणार ?

बांधकाम कामगार नोंदणी प्रमाण पत्रा साठी वापरले शिक्के , ग्रामसेवकाच्या केल्या बोगस सह्या ......

0 64

 

आनंद बलखंडे
आखाडा बाळापूर,दि 03 ः
हिंगोली जिल्हयातील मोठी ग्रामपंचायत व राजकीयदृष्ट्या सतत चर्चेत असलेली ग्रामपंचायत सद्या वेगळ्याच कारणाने फोकस मध्ये येत आहे . बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी बनावट शिक्के तयार करून ग्रामसेवकांची स्वाक्षरी वापरून केलेल्या जवळपास अकराशे प्रमाणपत्राची आता चौकशी होणार असून लवकरच संबंधीतांन वर गुन्हा दाखल केला जाणार आहे . या मुळे मात्र खळबळ उडाली असून संशया ची सुई कुणाला टोचल्या जाणार याची नागरिकात चर्चा होत आहे. बांधकाम कामगार कल्याण विभागा मध्ये जवळपास 1100 ते 1200 बोगस प्रमाणपत्रे अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले होते , कार्यालयाकडून तपासणी केल्यावर कामगार एका तालुक्यातील व प्रमाणपत्र दुसऱ्या तालुक्यातील असा धक्कादायक प्रकार समोर आला .सदरील कार्यालयाने हे सर्व प्रमाणपत्र पाठवून चौकशी करा असे कळविले , त्या वरून बाळापूर ग्रामपंचायत ने चौकशी केली असता अंदाजे 1100 प्रमाणपत्र बनावट शिक्के व सह्या करून दिल्या चे आढळून आहेत. त्या मुळे लवकरच या बाबतीत गुन्हा दाखल होण्याचे संकेत मिळाले आहेत

error: Content is protected !!