बेडसे येथे शेतकऱ्यांना मोफत डिजिटल सातबारा वाटप

0 20

बा-हे, किरण देशमुख – सातबारा हा सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणून सुरगाणा तालुक्यातील सजा आंबोडे पैकी बेडसे येथील शेतकऱ्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना मोफत डिजिटल सातबारा वाटपाचा शुभारंभ सामाजिक कार्येकर्ते संजय सिताराम पडेर यांच्या हस्ते वाटप करण्यात आला.शासनाने अमृत महोत्सवाचे औचित्य साधत प्रत्येक शेतकऱ्याला मोफत सातबाराचे वाटप करण्यात येत आहेत.

सातबाऱ्यात काही चुका आढल्यास त्यासाठी फार्म भरून दुरूस्त करण्यात येतील या उपक्रमाचा जास्तीतजास्त फायदा नागरिकांनी घेण्याचे आवाहन आंबोडे सजेचे तलाठी पोपट वाघमारे यांनी केले आहे.यावेळी पो.पा.बाबुराव अलबाड,मा.उप.सरपंच सुभाष वाघमारे,मोहन डोळे,शांतीलाल अलबाड,एकनाथ जाधव,हंसराज अलबाड,सिताराम पडेर,चिंतामण जाधव,गंगाराम अलबाड तसेच गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!