बँक अधिकारी जिवाजी वाघमारे यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय साहित्याचे वाटप

0 25

परभणी :- दि 12 ऑगस्ट
गरिबीशी झुंज देत आणि अंधत्वावर मात करत परभणी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विभागीय कार्यालयातील अधिकारी पदावर कार्यरत असलेले जिवाजी वाघमारे यांनी आपल्या वाढ दिवसा निमित्त अनावश्यक खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून समाजासमोर आगळा वेगळा आदर्श ठेवला आहे.

बुधवार दि 10 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विभागीय कार्यालयातील अधिकारी जिवाजी वाघमारे यांचा वाढ दिवस हडको येथील समाज मंदिरात शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमान अभिवादन करण्यात आले तसेच संबोधी विद्यालय, परभणी येथील वर्ग ८ वी, ९ वी आणि १० वीच्या गरजू विद्यार्थी – विद्यार्थिनींना शालेय पुस्तक, रजिस्टर, पेनचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेला १० वृक्षांची भेटही यावेळी देण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे विभागीय व्यवस्थापक जी एस देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पूजनीय भिक्षुनी अरियाजी धम्म आराधना, ज्ञानोपासक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक अशोक खोत, संबोधी विद्यालय परभणी स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष भगवान जगताप, पी एस कागदे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बडेराव सर, श्रीमती यशोदा राठोड, राज्य परिवहन मंडळ विभागीय कार्यालय परभणीचे संदीप प्रधान, स्वच्छ भारत मिशनचे संवाद तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संदीप खाडे, ऍड.सुरेश धबाले, संबोधी विद्यालयाचे शिक्षक वृंद यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी वाढ दिवसानिमित्त झालेल्या सत्काराला उत्तर देताना अंधत्वावर मात करून बँक अधिकारी बनलेले जिवाजी वाघमारे म्हणाले कि, मी अंध जरी असलो तरी माझ्या हाती असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा दिवा कधीच विझू न देता तो सतत तेवत ठेवील. तसेच विद्यार्थ्यांसाठीचा हा सामाजिक उपक्रम त्यांच्या सोयीसाठी १९ जून रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे जिवाजी वाघमारे यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोप करताना महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे विभागीय व्यवस्थापक जी एस देशमुख म्हणाले कि, जिवाजी वाघमारे यांनी घडवून आणलेला कार्यक्रम हा आनंदच दान असणारा आहे. तसेच वाघमारे यांनी गरजू शालेय विद्यार्थाना केलेली शालेय साहित्याच्या मदतीचे कौतुक यावेळी जी एस देशमुख यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संबोधी विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती भगत यांनी, प्रास्ताविक शाळेचे शिक्षक नवनाथ जाधव यांनी केले.

 

शालेय विद्यार्थ्यांमधून जिवाजी वाघमारे सारखे सामाजिक भान जपणारे डोळस अधिकारी घडावेत
संदीप प्रधान
वरिष्ठ लिपिक
राज्य परिवहन मंडळ विभागीय कार्यालय परभणी

गरिबीशी झुंज देत यशाच्या उंच शिखरावर बसलेल्या जिवाजी वाघमारे यांचा जीवनातील संघर्ष आणि त्यांची विद्यार्थ्यांशी असलेली सामाजिक बांधिलकीचा आदर्श समाजातील सुज्ञ व्यक्तींनी घेण्याची गरज आहे.
ज्ञानेश्वर गायकवाड,
संवाद तज्ज्ञ
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण
जिल्हा परिषद, परभणी

error: Content is protected !!