संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त निराधार ताईंना शिलाई मशीनचे वाटप,शेक हँड ग्रुपचा उपक्रम

0 124

परभणी,दि 21 (प्रतिनिधी)ः
शेक हँड कडून प्रत्येक सण व जयंती पुण्यतिथीनिमित्त गरजू ताईंना उदरनिर्वाहाचे साधन दिले जाते.गाडगेबाबांनी आपले पूर्ण आयुष्य स्वछता व सेवेसाठी वंचित घटकासाठी वेचले त्यांच्याच मार्गावर शेक हँड काम करत असून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त साधू नगर जवळा बाजार ता औंढा येथे राहाणाऱ्या रंजना ज्ञानोबा अस्वार यांना पिको फॉल मशीनचे वाटप दि 20 रोजी करण्यात आले. त्यांच्या पतीची दोन वर्षापूर्वी कौटुंबिक वादातून हत्या झाली.त्या नंतर त्या आपल्या माहेरी आई वडिलांकडे राहत आहेत.घर अत्यंत साध्या पत्र्याचे असून वडिलांकडील परिस्थिती देखील अत्यंत हालाखीची आहे. त्यांना कमलेश व गणेश नावाची दोन मुले असून एक पहिली व दुसरा बालवाडीत शिकत आहे.त्यांना शिलाई काम येत असून इतरांच्या मशीनवर त्या काम करतात.घरी कुठलीही संपत्ती नसून इतरांच्या मशीनवर काम करून त्या आपला उदरनिर्वाह चालवतात.म्हणून शेक हँड मार्फत संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त पिको फॉल मशीनचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रा.उत्तमराव इंगळे यांनी ताईंना साडी चोळी व मुलांना कपडे दिले.कार्यक्रमासाठी शेक हँड च्या अनेक सदस्यांनी मदतीचा हात पुढे केला.कार्यक्रमासाठी शेक हँड चे नितीन तांदळे,पांडुरंग चव्हाण,नागेश गंगथडे,शिवाजी चव्हाण व जवळा बाजार येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!